संशोधनातून आली नवीन माहिती समोर, TB ची लस करते कोविड संक्रमण आणि कोविडमुळे होणाऱ्या मृत्यूंचं प्रमाण कमी...

सुमित बागुल
Tuesday, 14 July 2020

कोरोनाची लस शोधण्यावर संपूर्ण जगात संशोधन सुरु आहे. अशात काही महत्त्वाच्या संशोधनांमुळे नवनवे आशेचे किरण समोर येताना पाहायला मिळतायत.

मुंबई - कोरोनाची लस शोधण्यावर संपूर्ण जगात संशोधन सुरु आहे. अशात काही महत्त्वाच्या संशोधनांमुळे नवनवे आशेचे किरण समोर येताना पाहायला मिळतायत. अशीच दोन महत्त्वाची संशोधनं नुकतीच केली गेलीत. यामधील एक महत्त्वाचं संशोधन भारतातही झालंय.

लहानपणी होणाऱ्या ट्युबरक्युलॉसिस म्हणजेच TB वर वापरली जाणारी बीसीजी (Bacillus Calmette–Guérin) ही लस कोरोनाचं संक्रमण आणि कोरोनामुळे मृत्यू रोखण्यासाठी गुणकारी ठरत असल्याचं काही महत्त्वाच्या संशोधनांमधून समोर आलंय. यामधील एक संशोधन दिल्लीतील जवाहरलाल  नेहरू युनिव्हर्सिटी म्हणजेच JNU मध्ये झालंय.  

मोठी बातमी - १०वी-१२ वीचा निकाल कधी लागणार?, महाराष्ट्र बोर्डानं केलं जाहीर

JNU मध्ये केलेल्या संशोधनाचा अहवाल नेचर ग्रुप पत्रिकेचा भाग असलेल्या  'सेल डेथ अँड डिसीज' यामध्ये प्रकाशित करण्यात आलाय. तर दुसरं संशोधन अमेरिकेत पार पडलं. दुसऱ्या संशोधनात बीसीजी (Bacillus Calmette–Guérin) ही लस कोविड मुळे होणारे मृत्यू रोखण्यास मदत करत असल्याचं निदर्शनास आलं. या संशोधनाचा अहवाल प्रोसिडिंग्स ऑफ द नॅशनल अकॅडमी ऑफ सायसन्सेस यामध्ये प्रकाशित केला गेलाय.  

जवाहरलाल नेहरू युनिव्हर्सिटी (JNU) च्या सेंटर  फॉर मॉलिक्युलर मेडिसिन विभागाचे अध्यक्ष गोबरधन दास यांनी याबाबत माहिती दिली. त्यांच्या म्हणण्यानुसार जगभरात १००० पेक्षा अधिक कोरोना संक्रमित रुग्णांवर या बाबतीतअध्ययन करण्यात आलं. यामध्ये भारत आणि भारताबाहेरही ज्यांना BCG ची लस देण्यात आली आहे त्यांना ज्यांना ही लस दिलेली नाही अशाना कोरोनाचा धोका कमी असल्याचं सिद्ध झालंय.  दास यांच्या माहितीप्रमाणे बीसीजी (Bacillus Calmette–Guérin) लसीतून मिळणारी रोगप्रतिकारक क्षमता कोरोनाचं संक्रमण आणि त्याची गंभीरता दोघांना कमी करण्यास मदत करेल.  

मोठी बातमी - नवी मुंबई महापालिका आयुक्तांची पुन्हा बदली, नव्या आयुक्तांनी स्विकारला पदभार

भारतात १९४९ पासून नवजात बालकांना BCG ची लस दिली जाते. या लसीमुळे लहानपणात होणारा टीबी आणि मेनिन्जायटिस टाळता येतो. २०१९ मध्ये भारतातील ९७ टक्के बालकांना ही लस देण्यात आली आहे. ही लस वयस्कारांमध्ये होणारा फुफ्फुसाचा टीबी रोखू शकत नाही आणि म्हणूनच जगभरातील अनेक देशांमध्ये ही लस देणं बंद केलं गेलंय. 

TB vaccine is helpful in preventing covid spread and reducing covid deaths research


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: TB vaccine is helpful in preventing covid spread and reducing covid deaths research