
pocket Theft
ESakal
उल्हासनगर : दिवाळीचा जल्लोष, उजळलेल्या बाजारपेठा आणि उल्हासनगरकरांची खरेदीची लगबग, असे काहीसे चित्र सध्या शहरात आहे. नेहरू चौक आणि आसपासच्या बाजारांत खरेदीदारांचा प्रचंड ओघ वाढल्याने पोलिसांनी सणासुदीची सुरक्षा मोहीम सुरू केली आहे. गणवेशधारी आणि सिव्हिल ड्रेसमधील पोलिस तैनात असतानाही पाकिटमारी आणि मुले हरवण्याच्या तक्रारींचा ओघ मात्र सुरूच आहे, ज्यामुळे नागरिकांमध्ये चिंता वाढली आहे.