

Ulhasnagar Police launched Operation All Out campaign
ESakal
उल्हासनगर : महापालिका निवडणूक आणि नववर्षाच्या पार्श्वभूमीवर उल्हासनगर शहरात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांनी ‘ऑपरेशन ऑल आऊट’ राबवले. अवघ्या तीन तासांच्या या विशेष मोहिमेत ४१ पोलिस अधिकारी आणि १८७ अंमलदारांच्या फौजफाट्याने शहराचा कोपरा अन् कोपरा पिंजून काढला. यामध्ये नाकाबंदी, कॉम्बिंग ऑपरेशन आणि हॉटेल-लॉजची शनिवारी (ता.२७) रात्री कसून तपासणी करण्यात आली.