पोलिस पाटलांचे मानधन वाढविण्याचे आश्वासन

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 29 नोव्हेंबर 2018

मुंबई - राज्यातील पोलिस पाटलांच्या वाढीव मानधन मागणीचा प्रश्‍न विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी उपस्थित केला आणि संघटनेच्या शिष्टमंडळाची गृहराज्यमंत्र्यांसोबत भेट घालून दिली. एक महिन्यात याप्रकरणी निर्णय घेण्याचे आश्वासन फडणवीस यांनी दिले.

पोलिस पाटलांचे मानधन वाढवून मिळावे यासाठी 28 नोव्हेंबर रोजी मुंबईतील आझाद मैदानात हजारो पोलिस पाटलांनी राज्यव्यापी धरणे आंदोलन आयोजित केले होते.

आंदोलकांचे एक शिष्टमंडळ धनंजय मुंडेंना भेटले. दरम्यान, मुंडे यांनी राज्यमंत्री दीपक केसरकर यांच्याशी आंदोलनकर्त्यांची भेट घालून दिली. याचबैठकीत लगेचच केसरकर यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांच्याशी संपर्क केला. या चर्चेदरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील पोलिस पाटलांच्या मानधन वाढीचा प्रश्न एक महिन्यात सोडवू, असे आश्वासन शिष्टमंडळाला दिले.

Web Title: Police Patil Honorarium Dhananjay Munde