
Navratrotsav 2025
ESakal
विरार : लाखो भाविकांच्या श्रद्धेचे स्थान म्हणून जीवदानी मंदिर ओळखले जाते. नवरात्रोत्सवात जीवधन गडावर मोठ्या प्रमाणात भाविक देवीच्या दर्शनासाठी येतात. त्यासाठी सुरक्षेच्या दृष्टीने मंदिर प्रशासनाने सर्व तयारी पूर्ण केली आहे. मंदिर परिसरात १६० सीसीटीव्हींच्या माध्यमातून तिसऱ्या डोळ्याची सतत नजर असणार आहे. त्याचबरोबर कोणताही घातपात होऊ नये, म्हणून शस्त्रधारी पोलिसांचा बंदोबस्त असणार आहे. याबाबत बुधवारी (ता. १७) अतिरिक्त आयुक्त दत्ता शिंदे यांनी बंदोबस्ताचा आढावा घेतला.