
Police raid BJP leader firecracker shop
ESakal
उल्हासनगर : दिवाळीच्या तोंडावर उल्हासनगरात धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. शहरातील सी-रॉक पॅलेस इमारतीच्या तळमजल्यात तब्बल ४० लाखांच्या बेकायदेशीर फटाक्यांचा साठा सापडल्याने एकच खळबळ उडाली आहे. विना परवानगी आणि कोणत्याही सुरक्षाविना ठेवलेला हा स्फोटक साठा नागरिकांच्या जीवाला गंभीर धोका निर्माण करणारा ठरला असून, विठ्ठलवाडी पोलिसांनी गोडाऊन सील करून फटाका व्यापारी आणि भाजप नेता विकी गुरनानी विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.