पोलिस भरतीच्या परीक्षेला आलेल्या मुलांची गैरसोय

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 12 एप्रिल 2018

तुर्भे - पोलिस भरतीच्या लेखी परीक्षेसाठी राज्याच्या ग्रामीण भागातून एक दिवस अगोदर नेरूळमधील डॉ. डी. वाय. पाटील स्टेडियमच्या परिसरात आलेल्या तरुण-तरुणींसाठी राहण्याची, जेवणाची, पिण्याच्या पाण्याची आणि शौचालयाची सुविधा नसल्याने त्यांची गैरसोय झाली. याची माहिती मिळताच मनसेचे नवी मुंबई शहर अध्यक्ष गजानन काळे व त्यांच्या सहकाऱ्यांनी त्यांना मदत केली.

पोलिस भरतीच्या परीक्षेसाठी पश्‍चिम महाराष्ट्र, कोकण, विदर्भ, खानदेश, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र आदी ठिकाणांहून शेकडो मुले-मुली मंगळवारी दुपारपासूनच नेरूळमध्ये आली होती. त्यांची राहण्याची सोय नसल्याने ते तेथील रस्त्याकडेलाच बसले होते. त्यामुळे मनसेने मुलींसाठी नेरूळमधील आश्रय हॉलमध्ये, तर मुलांसाठी फ्रुटवाले भवन हॉल येथे रात्री राहण्याची व्यवस्था केली. त्यांच्या जेवणाची व पिण्याच्या पाण्याची सोय केली. या प्रकारामुळे नवी मुंबईतील महाराष्ट्र भवनची गरज पुन्हा स्पष्ट झाली आहे. तेव्हा सिडको आणि सरकारने महाराष्ट्र भवनचे काम सुरू केले नाही तर आंदोलन केले जाईल, असा इशारा काळे यांनी दिला.

Web Title: Police recruitment examinations