SEBC आरक्षण न ठेवता भरती, गृह विभागाचा GR; पोलिस महासंचालकांनीही कार्यवाही करून अहवाल देण्याच्या सूचना

SEBC आरक्षण न ठेवता भरती, गृह विभागाचा GR; पोलिस महासंचालकांनीही कार्यवाही करून अहवाल देण्याच्या सूचना

मुंबई : राज्यातील पोलिस भरतीबाबत अत्यंत महत्त्वाची बातमी समोर येतेय. राज्यातील पोलिस भरती प्रक्रिया पार पाडण्यासाठी SEBC आरक्षण न ठेवण्याचा निर्णय राज्याच्या गृह विभागाकडून घेण्यात आलाय. पोलिस भरतीदरम्यान जे उमेदवार खुल्या प्रवर्गातील अटी व शर्तींची पूर्तता करतात, त्यांचा खुल्या प्रवर्गातून विचार करावा. SEBC तून अर्ज केलेल्या पोलिस भरतीतील उमेदवारांची पात्रता ठरविताना खुल्या प्रवर्गाची वयोमर्यादा लागू केली जाणार, असा निर्णय घेऊन त्याबाबतचा GR देखील जारी करण्यात आला आहे. 

या निर्णयानंतर आता SEBC तुन अर्ज केलेल्या उमेदवारांकडून ओपन कॅटेगरीमधील परीक्षा शुल्क आकारण्यात येणार आहे. दरम्यान या निर्णयानंतरचे वाढीव परीक्षा शुल्क उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने देखील भरता येऊ शकतं. पोलिस महासंचालकांनी यावर कार्यवाही करून शासनाला त्याबाबतचा अहवाल सादर करावा, अशा देखील सूचना गृह विभागाकडून देण्यात आल्या आहेत. 

मराठा आरक्षणावरील अंतरिम स्थगिती आल्यानंतर पोलिस भरती प्रक्रियाही स्थगित करण्यात आली होती. दरम्यान, भरती प्रक्रियेबतात वेळोवेळी मराठा नेत्यांनी आणि संघटनांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. आता राज्य सरकारच्या या निर्णयामुळे ममराठा समाजातून कशी प्रतिक्रिया येतेय हे जाणून घेणं महत्त्वाचं ठरणार आहे.  

police recruitment in maharashtra home ministry issued GR for SEBC candidates

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com