esakal | ठाण्यात पोलिस-रिक्षाचालक वाद
sakal

बोलून बातमी शोधा

ठाण्यात पोलिस-रिक्षाचालक वाद

ठाणे स्थानकातील वाहतूक पोलिस चौकी ते आलोक हॉटेलपर्यंतच्या पदपथाचे रुंदीकरण केले जात आहे. याशिवाय पुढील गोखले रोडवरील मार्गिका रिक्षा चालकांसाठी बंद करण्यात आली आहे. ठाणे महापालिकेच्या "स्मार्ट सिटी' योजनेतून उभारण्यात येत असलेल्या या उपक्रमावरून रिक्षाचालक आणि पोलिसांमध्ये वाद सुरू झाले असून वाहतूक उपायुक्तांनी यावर आता 8 दिवसांत तोडगा काढण्याचे आश्वासन दिले आहे. 

ठाण्यात पोलिस-रिक्षाचालक वाद

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

ठाणे : ठाणे स्थानकातील वाहतूक पोलिस चौकी ते आलोक हॉटेलपर्यंतच्या पदपथाचे रुंदीकरण केले जात आहे. याशिवाय पुढील गोखले रोडवरील मार्गिका रिक्षा चालकांसाठी बंद करण्यात आली आहे. ठाणे महापालिकेच्या "स्मार्ट सिटी' योजनेतून उभारण्यात येत असलेल्या या उपक्रमावरून रिक्षाचालक आणि पोलिसांमध्ये वाद सुरू झाले असून वाहतूक उपायुक्तांनी यावर आता 8 दिवसांत तोडगा काढण्याचे आश्वासन दिले आहे. 

ठाणे पश्‍चिमेकडील सॅटिस पुलाखालील रेल्वेस्थानक परिसरात वाट अडवणाऱ्या रिक्षाचालकांच्या मुजोरीला वेसण घालण्यासाठी किंबहुना, पादचाऱ्यांना विनाअडथळा मार्गक्रमण करता यावे, यासाठी ठाणे महापालिका आणि वाहतूक शाखेने नामी शक्कल लढवली आहे.

महिलेच्या पोटात कोकेन आणि कंडोम

ठाणे पश्‍चिम रेल्वेस्थानक परिसरातून दररोज तब्बल 7 लाख प्रवासी ये-जा करतात. त्यामुळे स्थानकाबाहेरील सॅटिस पुलाखाली नेहमीच वर्दळ असते. सॅटिसखाली रिक्षा-टॅक्‍सी स्टॅन्ड असूनही अनेक रिक्षा थांबा सोडून इतरत्र उभ्या केलेल्या असतात. वाहतुकीला शिस्त लागावी, यासाठी स्थानकाबाहेर वाहतूक चौकी उभारली आहे; तरीही वाहतूक कोंडी होत असल्याने स्थानक परिसरातून मार्गक्रमण करणाऱ्या प्रवाशांना अनंत अडथळे पार करून जावे लागते.

धावत्या लोकलवर फुगे फेकल्यास होणार कारवाई

त्यातच सायंकाळी फेरीवाल्यांचा उपद्रव असल्याने संपूर्ण रस्ता आणि पदपथ अडवून ठेवलेला असतो. यावर मार्ग काढण्यासाठी ठाणे महापालिका प्रशासनाने या ठिकाणी भव्य पदपथ उभारण्यास सुरुवात केली आहे. सॅटिस पुलाखाली असलेली पोलिस चौकी ते आलोक हॉटेलपर्यंत 10 फूट रुंदीचा आणि सुमारे 250 मीटर लांबीचा पदपथ तयार करण्यात येणार असून यासाठी तब्बल एक कोटींचा खर्च अपेक्षित धरण्यात आला आहे. 

रिक्षाचालकांना स्थानिकांची साथ 
वाहतूक पोलिस आणि रिक्षाचालक यांच्यात वाद उद्‌भवत असल्याने बुधवारी (ता. 4) वाहतूक शाखेचे उपायुक्त अमित काळे यांनी रिक्षाचालक आणि मालक संघटना यांच्यासोबत चर्चा केली; तसेच रिक्षाचा थांबा हलवण्याबाबत येत्या आठ दिवसांत तोडगा काढला जाईल, असे स्पष्ट केले. दरम्यान, रिक्षाचालकांना थेट स्टेशन परिसरात जाता येणार नसल्यामुळे रिक्षा संघटनांनी नाराजी व्यक्त केली असताना स्थानिकांचे मत विचारात न घेता हे बदल केल्याने स्थानिकांनीही आंदोलनाचा इशारा दिला आहे. 
 


 

loading image
go to top