
मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि शिवसेना ठाकरे गटाकडून आज सकाळपासून मिरा-भाईंदरमध्ये मराठी भाषेसाठी मोर्चा काढण्यात आला आहे. या मोर्चाला पोलिसांनी परवानगी नाकारली असली तरीही मनसेचे (MNS) नेते संदीप देशपांडे यांनी आम्ही मोर्चा काढणार, तसेच आज दिवसभर मोर्चा सुरूच राहणार असल्याचा इशारा दिला आहे. यामुळे पोलिसांनी मनसेच्या अविनाश जाधव यांच्यासह अनेक पदाधिकारी तसेच येथे जमलेल्या कार्यकर्त्यांना आणि मराठी नागरिकांना ताब्यात घेतले आहे.