2 कोटी 60 लाख रुपये किंमतीची व्हेल माशाची अँबर्गिस पोलिसांनी केली जप्त...आरोपी अटकेत | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

police seizes Ambergris whale fish worth Rs 2 crore 60 lakh accused arrested mumbai

2 कोटी 60 लाख रुपये किंमतीची व्हेल माशाची अँबर्गिस पोलिसांनी केली जप्त...आरोपी अटकेत

मुंबई : मुंबईत व्हेल माशाची उलटी (अँबर्गिस) विक्री करणाऱ्या आरोपीला मरीन ड्राईव्ह पोलिसांनी अटक केली आहे. पोलिसांनी सापळा रचून संशयितास अटक केली आणि 2.616 किलो वजन असलेली 2 कोटी 60 लाख रुपये किंमतीची व्हेल माशाची उलटी जप्त केली. 25 वर्षीय आरोपी हा दापोलीचा रहिवासी आहे. पोलिसाना एक इसम वेल माशाची उलटीघेऊन ती विक्री करण्याचे उद्देशाने ऑबेरॉय हॉटेल समोर, येणार असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार वन विभागाचे अधिकारी व पोलीस अधिकारी यांच्या संयुक्त पथकातर्फे ऑबेरॉय हॉटेलसमोर परिसरात पाळत ठेवण्यात आली.

काही वेळाने गुप्त बातमीदाराने दिलेल्या माहितीप्रमाणे एका संशयित इसमास हटकले असता त्याचे ताब्यात प्रतिबंधित केलेला वेल माशाची उलटी म्हणजेच एम्बरग्रीस हा पदार्थ मिळून आला. त्याची वन अधिकारी यांनी पाहणी करून खात्री केली असता त्याचे एकूण वजन 2.619 ग्रॅम असल्याचे व त्याची किंमत 2 कोटी 60 लाख रुपये असल्याची समजले. सदर आरोपीला मरीन ड्राईव्ह पोलिसांनी अटक केली असून अधिक तपास पोलीस करत आहे. या पदार्थाचा वापर उच्च दर्जाचे सुगंधित द्रव्यामध्ये करण्यात येत असून महारष्ट्र शासनाने या पदार्थांच्या विक्रीवर कायदेशीर बंदी घातली आहे.

Web Title: Police Seizes Ambergris Whale Fish Worth Rs 2 Crore 60 Lakh Accused Arrested Mumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..