esakal | पोलीस कर्मचाऱ्यास बलात्काराच्या गुन्ह्यातंर्गत अटक
sakal

बोलून बातमी शोधा

पोलीस कर्मचाऱ्यास बलात्काराच्या गुन्ह्यातंर्गत अटक

लग्नाचे वचन देत तिच्याशी शरीरसंबंध प्रस्थापित केले.

पोलीस कर्मचाऱ्यास बलात्काराच्या गुन्ह्यातंर्गत अटक

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा, सकाळवृत्तसेवा

नवी मुंबई - लग्नाचे प्रलोभन दाखवून 25 वर्षीय तरुणीसोबत मागील दोन वर्षे शरीरसंबंध ठेवून तिच्याशी विवाह न करता, दुसऱ्या तरुणीसोबत विवाह करणाऱ्या मुंबई पोलिस दलातील पोलिस कर्मचाऱ्याला रबाळे एमआयडीसी पोलिसांनी बलात्काराच्या गुह्यात अटक केली आहे. प्रवीण काटे (30) असे या पोलिस कर्मचाऱ्याचे नाव असून तो घाटकोपर येथील पंतनगर पोलिस ठाण्यात कार्यरत होता. 

हेही वाचा - फक्त हे कानातले घाला कोणी काढू शकणार नाही तुमची छेड

आरोपी पोलिस कर्मचारी प्रवीण काटे हा दोन वर्षांपूर्वी दिघा येथे मित्रांसमवेत राहाण्यास होता. त्यावेळी त्याची त्याच भागातील एका 25 वर्षीय तरुणीसोबत फेसबुकवरून मैत्री झाली. त्यानंतर त्यांच्यात प्रेमसंबंध निर्माण झाले. त्यानंतर प्रवीणने लग्नाचे वचन देत तिच्याशी शरीरसंबंध प्रस्थापित केले. त्यानंतर पुढे अनेक महिने या दोघांमध्ये प्रेमसंबंध होते, मात्र मागील डिसेंबरमध्ये प्रवीण याने पीडित तरुणीऐवजी दुसऱ्याच तरुणीसोबत पुणे येथे जाऊन विवाह केला. 

हेही वाचा - धक्कादायक! म्हणून त्याने तिला व्हिडिओ काॅलवर दिला तलाक

ही बाब पीडितेला समजल्यानंतर तिने रबाळे एमआयडीसी पोलिसांत प्रवीण याच्या विरोधात लैंगिक छळ केल्याची तक्रार दाखल केली होती. त्यानंतर पोलिसांनी प्रवीण विरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल केला होता. मात्र प्रवीण याने या गुह्यात अटक टाळण्यासाठी प्रथम सत्र न्यायालयात व नंतर उच्च न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी धाव घेतली होती. मात्र दोन्ही न्यायालयाने त्याचा अटकपूर्व जामीन फेटाळल्याने मागील सोमवारी रबाळे एमआयडीसी पोलिसांनी प्रवीणला अटक केली. न्यायालयाने त्याची पोलिस कोठडीत रवानगी केली असून पोलिसांकडून या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे. 

 web title : Policeman arrested for rape charge

loading image
go to top