Mumbai Police News : पोलीस कर्मचाऱ्याचा ऑन ड्युटी हृदय विकाराच्या झटक्याने मृत्यू | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Policeman dies due to heart attack on duty mumbai mulund police

Mumbai Police News : पोलीस कर्मचाऱ्याचा ऑन ड्युटी हृदय विकाराच्या झटक्याने मृत्यू

मुंबई : पोलीस वाहनावर कार्यरत असताना हृदयविकाराच्या झटका आल्याने पोलीस शिपायाचा मृत्यू झाल्याची घटना रविवारी मुलुंड येथे घडली. 48 वर्षीय रामा महाले असे या पोलीस शिपायाचे नाव असून, ते मुलुंड पोलीस ठाण्यात कार्यरत होते.

मुलुंड पोलीस ठाण्यातील मोबाईल पोलीस वाहनावर रामा महाले चालक म्हणून काम करत होते. रविवारी मुलुंड परिसरात गस्त घालत असताना अचानक त्यांच्या छातीत दुखू लागले आणि उलटी झाली.

त्यांच्या सहकाऱ्यांनी तात्काळ त्यांना परिसरातील अगरवाल रुग्णालयात दाखल केले. तेथे उपचार सुरू असताना त्यांना हृदयविकाराचा झटका आला. त्यात त्यांचा मृत्यू झाला. मुलुंड पोलिसांनी याबाबत अपमृत्यूची नोंद केली आहे.