पॉलिसीवर लोन मिळवून देण्याच्या बहाण्याने फसवणूक 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 24 जुलै 2018

नवी मुंबई - मोरा पोलिसांनी विक्रोळी भागात सुरू असलेल्या बनावट कॉल सेंटरवर छापा मारून 11 जणांना अटक केली. या टोळीने कॉल सेंटरच्या माध्यमातून इन्शुरन्स पॉलिसीवर लोन मिळवून देण्याच्या बहाण्याने मुंबईसह ठाणे, रायगड जिह्यातील शेकडो लोकांची लाखो रुपयांची फसवणूक केल्याचा संशय पोलिसांकडून व्यक्त करण्यात येत आहे. 

नवी मुंबई - मोरा पोलिसांनी विक्रोळी भागात सुरू असलेल्या बनावट कॉल सेंटरवर छापा मारून 11 जणांना अटक केली. या टोळीने कॉल सेंटरच्या माध्यमातून इन्शुरन्स पॉलिसीवर लोन मिळवून देण्याच्या बहाण्याने मुंबईसह ठाणे, रायगड जिह्यातील शेकडो लोकांची लाखो रुपयांची फसवणूक केल्याचा संशय पोलिसांकडून व्यक्त करण्यात येत आहे. 

पोलिसांनी या कॉल सेंटरमधून 24 मोबाइल, 30 सिम कार्ड, 2 लॅपटॉप, एक कॉम्प्युटर, रबर स्टॅम्प, रजिस्टर व काही कागदपत्रे जप्त करून तपास सुरू केला आहे. 11 जणांच्या टोळीने विक्रोळी पश्‍चिम येथील वर्धमान कॉम्प्लेक्‍समध्ये बनावट कॉल सेंटर सुरू केले होते. या टोळीने विविध इन्शुरन्स कंपन्यांमधील पॉलिसीधारकांची माहिती मिळवून त्या-त्या इन्शुरन्स कंपनीतून बोलत असल्याचे सांगून पॉलिसीधारकांशी कॉल सेंटरच्या माध्यमातून संपर्क साधत होते. त्यानंतर त्यांना पॉलिसीवर लोन मिळवून देण्याचे अथवा पॉलिसी सेटलमेंट केल्यास लाखो रुपये मिळतील, असे अमिष दाखवून त्यांना अधिकची रक्कम भरण्यास भाग पाडत होते. तसेच त्यांना पैसे भरण्यासाठी त्यांचे बॅंक अकाऊंट नंबर देत असत. एखाद्या पॉलिसीधारकाने सदरच्या बॅंक अकाऊंटमध्ये पैसे जमा केल्यास ते पैसे एटीएमच्या माध्यमातून काढून फसवणूक करण्यात येत होती. 

अशाच पद्धतीने या टोळीने उरण भागात रहाणाऱ्या हेमंत म्हात्रे या मुख्याध्यापकाची फसवणूक केली असून, त्यांना 96 हजार रुपयाचा गंडा घालण्यात आला आहे. 

फसवणुकीची पद्धत 
मुख्याध्यापक हेमंत म्हात्रे यांना या टोळीने डीएचएफएल लाईफ इन्शुरन्स कंपनीतून बोलत असल्याचे सांगून संपर्क साधला होता. तसेच त्यांच्या पॉलिसीचे हप्ते थकल्याने त्यांनी सदरचे हप्ते भरल्यास त्यांना सेटलमेंट अमाऊंट म्हणून 34 लाख 90 हजार रुपये मिळतील, असे अमिष दाखवून 96 हजार रुपये भरण्यास भाग पाडले होते. त्यासाठी एक बनावट अकाऊंट नंबर दिला होता. हेमंत म्हात्रे यांनी या अकाऊंटमध्ये पैसे भरल्यानंतर या टोळीने डीएचएफएल लाईफ इन्शुरन्स या कंपनीचे तसेच भारतीय आयकर विभागाच्या बनवाट पत्राची पावती तयार करून म्हात्रे यांना पाठवली होती.

Web Title: policy loan fraud case