या "रत्नां'ची डोकी  ठिकाणावर आहेत का? देवेंद्र फडणवीस यांची सडकून टीका

सकाळ वृत्तसेवा 
Monday, 8 February 2021

कॉंग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी आज चौकशीसंदर्भात केलेल्या मागणीची महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दखल घेताच फडणवीसांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली.

मुंबई - भारतरत्न लता मंगेशकर आणि सचिन तेंडुलकर यांच्या ट्विटची चौकशी करण्याची मागणी करणारे आणि ती मान्य करणारे लोक संताप आणत असून, यांचे डोके ठिकाणावर आहे का, अशी संतप्त विचारणा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आज केली. 

मुंबई, ठाणे, रायगड, पालघर परिसरातील बातम्यांचा आढावा घेण्यासाठी येथे क्लिक करा

कॉंग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी आज चौकशीसंदर्भात केलेल्या मागणीची महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दखल घेताच फडणवीसांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली. कुठे गेला महाराष्ट्रधर्म आणि मराठीबाणा, अशी विचारणा करत त्यांनी शिवसेनेवरही निशाणा साधला. भारतरत्नांची चौकशी करणारे हे कोण "रत्न', अशी विचारणा करत त्यांनी हा संपूर्ण प्रकार संतापजनक असल्याचे मत नोंदवले.

-----------------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )

political breaking marathi Criticism Mahavikas Aghadi Bharat Ratna inquiry devendra fadnwis politics updates 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: political breaking marathi Criticism Mahavikas Aghadi Bharat Ratna inquiry devendra fadnwis politics updates