राजकीय निशाण्यांची दुकानांत गर्दी

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 24 जानेवारी 2017

परळ - महानगरपालिका निवडणुकीचे बिगुल वाजताच लालबाग येथील बाजारपेठेत विविध राजकीय पक्षांच्या निशाण्या विक्रीसाठी दाखल झाल्या आहेत; मात्र यंदाच्या पालिकेच्या निवडणुकीत आघाडी आणि युतीचा संसार कायम राहणार, की ते स्वतंत्र चूल मांडणार, याबाबत अजूनही संदिग्धता असल्याने दुकानांमध्ये हे प्रचार साहित्य खरेदी करण्यासाठी अद्याप गर्दी झालेली नाही.

पालिका निवडणुकांच्या तारखा जाहीर झाल्यानंतर इच्छुक उमेदवारांची पक्ष मुख्यालयाबाहेर गर्दी होत आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा आघाडीचा निर्णय झालेला नसल्याने आणि जागावाटपाबाबतही निर्णय झालेला नाही; पण तो जेव्हा होईल तेव्हा होईल, पण दुकाने सर्व राजकीय पक्षांचे झेंडे, त्यांच्या निशाण्या विक्रीसाठी ठेवून सज्ज झाली आहेत. यंदा राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांना आकृष्ट करण्यासाठी राजकीय पक्षांच्या निशाण्यांची विक्री करणाऱ्या विक्रेत्यांनी विविध युक्‍त्या लढवल्या आहेत. राजकीय पक्षांची चिन्हे असलेल्या टोप्यांच्या बरोबरीने बॅगा, मोबाईल पाऊच, पर्स, की-चेन, कॉर्पोरेट बॅगा विक्रीसाठी आणल्या आहेत. त्याचप्रमाणे राजकीय पक्षांचे छोटे कटआऊटही विक्रीसाठी आणले आहेत. पालिका निवडणुकीसाठी उमेदवारी निश्‍चित झाली, की या सर्व गोष्टींची खरेदीसाठी राजकीय कार्यकर्त्यांची झुंबड उडेल, अशी अपेक्षा लालबाग येथील दुकानदारांनी व्यक्त केली आहे.

यंदाच्या निवडणुकांसाठी बहुतांश राजकीय पक्षांच्या आवडीनिवडी लक्षात घेऊन यंदा स्वतः तयार केलेले १० नवनवीन डिझाईनचे प्रचार साहित्य बाजारात उतरवले आहे. यात महिलांसाठी राजकीय पक्षांच्या निशाणी असलेल्या बॅग, मोबाईल पाऊच, पर्स तयार केली आहे.
-एस. ए. तेंडोलकर, विक्रेते, लालबाग मार्केट

Web Title: political flag in shop