

Leaders from the Dombivli-Kalyan region seen engaging in discussions as new political equations take shape.
Sakal
-शर्मिला वाळुंज
डोंबिवली: कल्याण डोंबिवलीचा राजकीय पट सध्या एका अनिश्चित पण रंजक वळणावर आहे. राजकारणात कोणी कायमचा मित्र नसतो आणि कायमचा शत्रूही नसतो ही जुनी म्हण येथे दर काही दिवसांनी खरी ठरताना दिसते. दीर्घकाळ ज्या नात्यांमध्ये तणाव आणि कट्टरता होती, त्याच नात्यांत आज सौहार्दाचे सूर उमटताना दिसत आहेत, तर काही जुनी मैत्रीला तडे जाऊन तेथे नवीन दुरावा रेषा उमटताना पाहायला मिळत आहे.