

“After Modi meeting, BJP’s Bawankule plays political masterstroke; signs of a quiet power struggle in Thane’s alliance politics.”
Sakal
-शर्मिला वाळुंज
डोंबिवली: भारतीय जनता पक्षाच्या प्रत्येक कार्यकर्त्याचे स्वप्न - भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची प्रत्यक्ष भेट घेणे! हे स्वप्न अखेर डोंबिवलीतील निवडक कार्यकर्त्यांचे पूर्ण झाले. हे स्वप्न पूर्ण करण्याचे श्रेय आता भाजप प्रदेशाध्यक्ष तथा डोंबिवलीचे आमदार रवींद्र चव्हाण यांना मिळत आहे. मात्र या भेटीमागे प्रदेशाध्यक्ष चव्हाण यांची राजकीय खेळी आणि ठाणे जिल्ह्यातील शिंदे गटाशी चाललेले सुक्ष्म सत्तासंघर्ष आता चर्चेत आले आहेत.