...तर रात्री 12.00 नंतर महाराष्ट्रात लागणार राष्ट्रपती राजवट

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 5 November 2019

निवडणुकीचा निकाल लागून अकरा दिवस उलटले तरी सत्तास्थापनेचा तिढा सुटू शकलेला नाही. शिवसेनेकड़ून चर्चेची दारं बंद असल्यानं भाजप वेट अँन्ड वॉचच्या भूमिकेत आहे. 8 नोव्हेंबरपर्यंत सत्तास्थापनेचा तिढा सुटू शकला नाही तर रात्री 12 नंतर राष्ट्रपती राजवट लागू होण्याची प्रक्रिया सुरू होईल. याच काळात फोडाफोडीच्या राजकारणाला वेग येईल असा राजकीय विश्लेषकांचा अंदाज आहे.

राष्ट्रपती राजवट लागू झाल्यास आमदार सांभाळणं हे प्रत्येक पक्षासमोर आव्हान असेल. हे फोडाफोडीचं राजकारण भाजपसाठी फायद्याचं ठरेली अशीही चर्चा आहे. मात्र, दुसरीकडे राष्ट्रवादीनं आक्रमक भूमिका घेत बांधावरच्या आमदारांना धोक्याचा इशारा दिलाय. 

महाराष्ट्रात मुख्यमंत्रिपदाला समकक्ष यंत्रणा उभारणार?

सत्तेच्या राजकारणात काहीही घडू शकतं याची शेकडो उदाहरणं आपल्या डोळयासमोर आहेत. त्यामुळे पुढील काही दिवस काँग्रेस-राष्ट्रवादी आणि शिवसेनेसाठी अतिशय महत्वाचे आहेत. त्यातूनही आमदारांची फाटाफूट झाली तर राज्यात एक वेगळंच चित्र पाहायला मिळेल. 

शिवसेनेचं 48 तासांचं अल्टिमेटम 

भाजपकडून प्रतिसादासाठी पुढचे 48 तास शिवसेना वाट पाहणार असल्याची माहिती सुत्रांकडून मिळतेय. पुढच्या 48 तासात भाजपकडून प्रतिसाद आला नाही तर शिवसेना आपला प्लान 'B' वापरणार असल्याचं सूत्रांकडून समजतंय. भाजप सोबत 50-50 च्या सूत्रावर पाणी फिरलं तर शिवसेनेकडे राष्ट्रवादी सोबत  हातमिळवणी करत सरकार स्थापन करण्याचा प्लान 'B' आहे. कॉंग्रेस शिवसेना आणि राष्ट्रवादीला बाहेरून पाठींबा देण्यार अशी सूत्रांची माहिती आहे. 

भारतात 'या' शहरातील तरुण सर्वात आधी गमावतात आपली व्हर्जिनिटी..

यात आता शिवसेना आणि भाजपात संवाद बंद असल्याची शिवसेनेची भावना आहे. त्यामुळे येत्या 48 तासात जर भाजपकडून कोणताही प्रतिसाद आला नाही तर शिवसेना आपला प्लान 'B' चं रुपांतर प्लान 'A' मध्ये करू शकतो असं आता सूत्रांकडून समजतंय. 
 
स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: politically next 48 hours are very crucial for maharashtra