Maharashtra Politics: महाविकास आघाडीच्या वज्र मुठीने पुन्हा विजयाचा झेंडा फडकवू

MLA Sunil Bhusara Palghar Political : आमदार सुनिल भुसारा यांचे प्रतिपादन, महाविकास आघाडीच्या बैठकांचा धडाका.
Maharashtra Politics
Maharashtra Politicssakal

Palghar Politics : भाजप आणि विरोधक धार्मिक मुद्दे पुढे आणून जातीच्या नावावर राजकारण करीत आहेत. सर्व घटक पक्षाकडून याच वेळी वाढती महागाई, बेरोजगारी, दोन कोटी नोकऱ्यांचे आश्वासन, 15 लाख देण्याची घोषणा, हे महत्वाचे मुद्दे मागे पडत आहेत. तशीच स्थिती राज्यातही आहे यामुळे या शक्तीला रोखण्यासाठी देशात इंडीया आघाडी एकत्र झाली आहे. अशावेळी पालघर जिल्हयात त्यांचा पराभव करण्यासाठी माहविकास आघाडीची वज्र मूठ आपण बांधली असून या आधी सुध्दा आघाडीतून लढलेल्या सर्व विधानसभांवर महाआघाडीचे आमदार निवडून आले होते.

Maharashtra Politics
Palghar News: ग्रामीण रुग्णालयाचा प्रस्ताव अडकला लाल फितीत!

यावेळी शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे आपल्या सोबत आहे. त्यामुळे जिल्हयात पुन्हा आपला महाविकास आघाडीचा झेंडा फडकवू असा विश्वास आमदार सुनिल भुसारांनी महाविकास आघाडी च्या बैठकीत व्यक्त केला आहे.          

पालघर जिल्हयातील प्रत्येक तालुकानिहाय सध्या महाविकास आघाडीतील घटक पक्षाकडून बैठकांचा धडाका लावला आहे. यामध्ये शिवसेना ठाकरे गट, राष्ट्रवादी, सीपीएम आणि काँग्रेस या पक्षातील सर्व प्रमुख कार्यकर्ते पदाधिकारी मोखाड्यात उपस्थित होते.

यावेळी आमदार भुसारांनी विक्रमगड विधानसभेतील मतांच्या गणिताची मांडणी करून भाजप सरकार हे आदिवासींच्या विरोधातील सरकार असून आरक्षण नष्ट करणे, शेतकऱ्यांच्या पिकांना चांगला भाव न देणे, भाजपचे नेते धनगर समाजाला आदिवासींच्या सवलती लागू करण्याची मागणी करीत आहेत.

Maharashtra Politics
Palghar News: समितीच्या धडक कारवाईने बोगस डाॅक्टरांचे धाबे दणाणले; कित्येक झाले भूमिगत!

    यामुळे हे सरकार आदिवासींच्या आणि सर्वसामान्य लोकांच्या विरोधातले सरकार आहे. त्यांच्या विरूद्ध कोणी लढू नये यासाठी इडीचा वापर केला जातो आहे. जात, धर्म, पक्ष, पंथ, वर्ण, याच्या पलीकडे जावून आपण एकत्र येऊन लढण्याची आवश्यकता असल्याचे भुसारांनी सांगितले आहे.

 यावेळी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख विकास मोरे यांनी आपण सर्व एकत्र आलो आहोतच उद्धव ठाकरे यांना काँग्रेस राष्ट्रवादी यांनी साथ दिली आहे. यामुळे आम्ही पूर्ण ताकदीने क्षमतेने तुमच्या सोबत राहु. उमेदवार कोणाचाही आणि कोणताही असो आपण त्याला निवडून आणून पूनहा भाजपमुक्त जिल्हा करुयात असे आवाहन कार्यकर्त्यांना केले आहे.

Maharashtra Politics
Palghar Crime: कत्तलीसाठी जनावरांची स्कॉर्पिओ गाडीतुन वाहतुक, पोलीसांनी पाठलाग करून गाडी पकडली. 

सह संपर्क प्रमुख निलेश गंधे यांनी उमेदवार स्थानिकच देण्यात येईल त्यामुळे येथील विकास करण्यास तो कटीबध्द असेल असे सांगितले आहे. मधुकर चौधरी, अशोक पाटील, प्रमोद कोठेकर,जमाशीद शेख यांनी मनोगत व्यक्त केले आहे. एकाच दिवशी जव्हार आणि मोखाडा या दोन्ही तालुक्यात या आढावा बैठकी घेण्यात आल्या आहेत. येणाऱ्या निवडणुकांत एकत्र लढताना एकमेकांची ओळख व्हावी,विचारविनमय व्हावा यासाठी महाविकास आघाडी च्या बैठका घेण्यात येथ असल्याचे यावेळी आयोजकांनी सांगण्यात आले आहे.

तरुणांचा राष्ट्रवादीत प्रवेश

  या आढावा बैठकीत मोखाडा तालुक्यातील अनेक तरुणांनी राष्ट्रवादीत जाहीर प्रवेश केला आहे. हे सर्व तरुण शिवसेना शिंदे गटाशी संबंधित होते. मोखाडा नगरपंचायत क्षेत्रातील गणेश सापटा, शोएब पिंजारी यांच्या नेतृत्वाखाली जवळपास  50  हून अधिक तरुणांनी प्रवेश घेवून राष्ट्रवादीचा झेंडा हातात घेतला आहे.

Maharashtra Politics
Palghar Politics: पालघरच्या जागेवरून शिवसेना भाजपमध्ये रस्सीखेच; नक्की कोणाला मिळणार जागा?

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com