Mumbai High Court
sakal
मुंबई : मुंबई उच्च न्यायालयाच्या वांद्रे पूर्वेतील प्रस्तावित संकुलासाठी सरकारी वसाहतीच्या पाडकामस्थळी प्रदूषणविषयक नियमांचे उल्लंघन झाले आहे. उच्च न्यायालयानेच नियुक्त केलेल्या विशेष समितीने सोमवारी (ता.२२) याबाबतचा अहवाल सादर केला. या प्रकरणी न्यायालयीन मित्र (ॲमिकस क्युरी) वरिष्ठ वकील दारायस खंबाटा यांनी अनेक ठिकाणी महापालिका आणि एमपीसीबीच्या मार्गदर्शक तत्त्वांचे पालन होत नसल्याचेही न्यायालयाला सांगितले.