दिल्लीपेक्षा "बीकेसी' प्रदूषित! 

मुंबई ः वांद्रे कुर्ला संकुल परिसरात बुधवारी प्रदूषणाची पातळी सर्वाधिक जास्त होती. सर्वत्र धुरके पसरले होते.
मुंबई ः वांद्रे कुर्ला संकुल परिसरात बुधवारी प्रदूषणाची पातळी सर्वाधिक जास्त होती. सर्वत्र धुरके पसरले होते.

मुंबई : मुंबईचा पारा उतरू लागल्याने गुलाबी थंडीची चाहूल लागली असली, तरी या गारव्याचे दुष्पपरिणामही दिसू लागले आहेत. मुंबईतील अनेक भागांमध्ये बुधवारी (ता. 20) धुरके दाटून आले होते. त्यातच वांद्रे-कुर्ला संकुल (बीकेसी) बुधवारी दिल्लीहून अधिक प्रदूषित झाले होते. 10-12 दिवसांपासून नवी मुंबईतील प्रदूषणाची धोकादायक पातळीही कायम आहे. गुरुवारीही नवी मुंबई आणि बीकेसीतील ही स्थिती अशीच राहण्याची शक्‍यता वर्तवली जात आहे. 

थंडीच्या कालावधीत हवेचा वेग कमी असतो. त्यामुळे प्रदूषके हवेच्या खालच्या थरात साचू लागतात. तीन चार दिवसांपासून मुंबईत गारवा जाणवू लागला आहे. त्यामुळे शहरातील अनेक ठिकाणी सकाळी 9 ते 10 वाजेपर्यंत आणि सूर्यास्तानंतर धुरके दाटून येते. या धुरक्‍यात प्रामुख्याने तरंगत्या धुलिकणाचे प्रमाण सर्वाधिक असते. "बीकेसी' हे मुबंईतील महत्त्वाचे जंक्‍शन आहे. कलानगर जंक्‍शन येथून दररोज वर्दळीच्या वेळी तासाला 15 ते 16 हजार वाहने ये-जा करतात. त्यामुळे परिसरात इतर वेळीही सर्वाधिक प्रदूषणाची नोंद होते. 

भारतीय उष्णकटिबंधीय संस्थेच्या "सफर' उपक्रमाने बुधवारी बीकेसीमध्ये तरंगत्या धुलिकणाचे (पीएम 2.5) प्रमाण प्रति घनमीटर हवेत 313 मायक्रोग्रॅम नोंदवले, तर दिल्लीतील सरासरी (पीएम 2.5) 312 मायक्रोग्रॅम होती. नवी मुंबईत हे प्रमाण 239 मायक्रोग्रॅम होते. 
 

काय काळजी घ्याल? 

घसा, डोळे सांभाळा : प्रदूषणाचे प्रमाण वाढल्यावर धुरके मोठ्या प्रमाणात निर्माण होऊ शकते. हे धुरके मानवी आरोग्यावर थेट परिणाम करतात. धुरकऱ्यांमुळे डोळे चुरचुरणे, घसा खवखवणे आणि कफ होण्याची भिती असते. 

प्रभात फेरी टाळा : सकाळी धुरक्‍याचे प्रमाण अधिक असते. त्यामुळे अशा हवेत ज्येष्ठ नागरिक, श्‍वसनाचे आजार असलेले, लहान मुले घराबाहेर पडल्यास आरोग्यावर परिणाम होऊ शकतो. बीकेसीतील प्रदूषणाची पातळी पाहता प्रभात फेरी टाळावी, असा सल्ला डॉक्‍टरांकडून दिला जात आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com