पॉलिटेक्‍निकची प्रवेश प्रक्रिया सुरू

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 21 जून 2018

मुंबई - राज्य प्रवेशपूर्व सामाईक परीक्षा कक्षाने पॉलिटेक्‍निक प्रवेश प्रक्रियेचे वेळापत्रक जाहीर केले आहे. विद्यार्थ्यांना 21 जून ते 16 जुलै या कालावधीत अर्ज सादर करता येणार आहेत. या अभ्यासक्रमाची पक्की गुणवत्ता यादी 21 जुलैला जाहीर होणार आहे. पॉलिटेक्‍निक प्रवेशाच्या यंदाही चार फेऱ्या होणार आहेत.

www.mahacet.org/poly2018 या संकेतस्थळावर विद्यार्थ्यांना अर्ज भरता येईल. अर्ज सादर करण्याच्या कालावधीत विद्यार्थ्यांना अर्ज स्वीकृती केंद्र आणि सुविधा केंद्रात जाऊन आपल्या मूळ गुणपत्रकांची छाननी करून घ्यावी लागणार आहे.

Web Title: polytechnic entrance exam start