संजय राठोड यांचा राजीनामा? संजय राऊत यांनी दिली प्रतिक्रिया

संजय राठोड यांचा राजीनामा? संजय राऊत यांनी दिली प्रतिक्रिया

मुंबई: पूजा चव्हाण या नावाने महाराष्ट्रातलं राजकारणात गदारोळ निर्माण झाला आहे. मूळ परळीच्या पूजा चव्हाणचा पुण्यातील राहत्या घरातून पडून 7 फेब्रुवारीला मृत्यू झाला. पूजाने आत्महत्या केल्याचा प्राथमिक संशय व्यक्त करण्यात आला आहे. या प्रकरणात कथित मंत्र्यांची ऑडिओ क्लिप समोर आली. त्यात शिवसेना नेते आणि राज्याचे वनमंत्री संजय राठोड यांचं नावही उघड झाले. त्यानंतर त्यांच्या राजीनाम्याची मागणी विरोधक करु लागले आहेत. याच पार्श्वभूमीवर या प्रकरणावर शिवसेना नेते संजय राऊत यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. 

संजय राठोड प्रकरणात सरकारमधील प्रमुख नेते निर्णय घेतील. राठोड हे शिवसेनेचे प्रमुख नेते आहेत. पोलिस तपासाचे आदेश मुख्यमंत्री यांनी दिले आहे. गृहमंत्र्यांनीही आपले मत मांडले आहे, असल्याचं संजय राऊत यांनी म्हटलं आहे. 

तसंच संजय राठोड यांच्या राजीनाम्यावरुन शिवसेनेत दोन गट निर्माण झाल्याचीही चर्चा रंगू लागली आहे. एक गट नैतिकता जपण्यासाठी संजय राठोड यांनी राजीनामा द्यावा तर दुसरा गट राठोड यांच्यावर कुठलीही कारवाई होऊ नये, असे म्हणत आहे. यावरही संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

संजय राऊत पुढे म्हणाले की, सरकार भूमिका घेत नाही हे म्हणणे चुकीचे  आहे. वर्षावरील शिवसेनेची  बैठक ही दुसऱ्या कुठल्याही कारणांनी बोलवली नाही ती नियमित बैठक आहे. शिवसेनेत कोणतीही गटबाजी नाही. 

 देशाच्या सुरक्षेबाबत काय लिहावे आणि काय लिहू नये. हे शिवसेनेला शिकवण्याची गरज नाही. भाजपच्या आयटी सेल देश चालवत नाही. आयटी सेलच्या नादात देशात अफवा पसरवल्या जात आहेत. देशाचं नुकसान होतं आहे. लोकांमध्ये भीतीचे वातावरण असल्याचंही राऊत यांनी म्हटलं आहे. 

लोकसभेतल्या तृणमूल काँग्रेसच्या नेत्यांनी आपल्यावर पाळत ठेवल्याची तक्रार नोंदवली आहे. ती पाळत आमच्यावरही ठेवली जात आहे. या यंत्रणा सरकारच्या हातात असल्यामुळे सरकार कोणत्याही मार्गाने आमच्यावर पाळत ठेऊ शकते, असंही ते म्हणालेत.

Pooja chavan case shivsena minister sanjay rathod Resigned Sanjay raut reaction

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com