Mumbai : वसई-विरारमधील रस्त्यांची दुरवस्था | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

vasai

वसई-विरारमधील रस्त्यांची दुरवस्था

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

वसई : वसई-विरार शहर महापालिका रस्ते विकासासाठी कोट्यवधींचा निधी खर्च करत आहे. मात्र हा निधी कागदावरच खर्च होतो आहे का, असा संतप्त सवाल वाहनचालक विचारत आहेत. कारण शहरातील रस्त्यांवर खड्डे पडले असून ठिकाणी डांबर जाऊन खडी उघडी पडली आहे. त्यामुळे वाहने पंक्चर होण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे रस्त्याच्या दुरवस्थेला जबाबदार कोण, असा प्रश्न विचारण्यात येतो आहे.

रोज हजारो नागरिक हे शहरातील मार्गावरून वाहनाने ये-जा करत असतात. रस्त्यावर असलेले खड्डे आणि खडी उघडी पडल्याने वाहनाचे चाक पंक्चर झाले तर येणारा अधिक खर्च माथी पडतोच मात्र टायर, इंजिनसह वाहनांच्या देखभालीचा खर्च वाढत आहे. श्रीप्रस्थ, साईनगर, आचोळे मार्ग, नवजीवन, वालीव, संतोष भुवन, पेल्हार, टोलनाका मार्ग, गोखिवरे, सातिवलीसह महामार्गावर अशीच परिस्थिती रस्त्यांची आहे. त्यामुळे संताप होत आहे.

जे रस्ते खराब झाले होते. ते दुरुस्त केले आहेत. तसेच अन्य ठिकाणी नादुरुस्त मार्गाचे कामही हाती घेण्यात येईल. शहरातील मार्गाची पाहणी करण्याच्या सूचना संबंधित प्रभाग समितीला देण्यात येतील.

- राजेंद्र लाड, कार्यकारी अभियंता, पालिका

loading image
go to top