esakal | अभिनेत्री गहना वशिष्ठचा जामीन अर्ज हायकोर्टाने फेटाळला
sakal

बोलून बातमी शोधा

Gehana vasisth

अभिनेत्री गहना वशिष्ठचा जामीन अर्ज हायकोर्टाने फेटाळला

sakal_logo
By
सुनिता महामुनकर

मुंबई : पोर्नोग्राफी प्रकरणात (Pornography case) आरोपी असलेल्या मॉडेल अभिनेत्री गहना वशिष्ठ (Gehana Vasisth) चा जामीन अर्ज (bail application) मुंबई उच्च न्यायालयाने (Mumbai high court) आज फेटाळला. गहनाच्या विरोधात तीन एफआयआर (FIR) दाखल आहेत.

हेही वाचा: रेल्वे प्रवास करणे हा मूलभूत अधिकार पण परिस्थितीनुसार निर्बंध लागू शकतात- हायकोर्ट

धाक दाखवून पिडीत महिलांकडून अश्लील वर्तन करुन घेतले आणि ते ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शन केले, असा आरोप तिच्यावर ठेवला आहे. यामध्ये अटक होण्याच्या शक्यतेमुळे तिने जामिनासाठी अर्ज केला होता. न्या संदीप शिंदे यांनी आज हा जामीन अर्ज फेटाळला. मुंबई पोलिसांनी तिच्या विरोधात भादंवि कलम 370 (अश्लिल कारणांमुळे मानवी तस्करी) दाखल करण्यासाठी सत्र न्यायालयात अर्ज केला आहे.

ज्या महिलांनी यामध्ये तक्रार केली आहे त्या स्वेच्छेने यामध्ये सहभागी झाले होते आणि करार केला होता आणि कंटेटचे प्रमोशनही केले होते, असा युक्तिवाद गहनाच्या वतीने करण्यात आला होता. तर गहनाकडून आर्थिक व्यवहारांची माहिती घ्यायची आहे, आणि अन्य व्हिडीओबाबत माहिती हवी आहे, असा खुलासा पोलिसांकडून करण्यात आला. न्यायालयाने याची दखल घेत जामीन नामंजूर केला.

loading image
go to top