राज कुंद्राच्या याचिकेवर उच्च न्यायालयाने निकाल ठेवला राखून

Raj Kundra
Raj Kundrasakal media

मुंबई : पोर्नोग्राफी प्रकरणात (Pornography case) अटक केलेल्या उद्योगपती राज कुंद्राच्या (raj kundra petition) याचिकेवरील मुंबई उच्च न्यायालयातील (Mumbai high court) सुनावणी पूर्ण झाली असून न्यायालयाने निकाल (result) राखून ठेवला आहे. आरोपी पुरावे नष्ट करत असेल तर पोलिसांनी बघत बसायचे का, असा युक्तिवाद मुंबई पोलिसांकडून करण्यात आला. (Pornography case-raj kundra petition-Mumbai high court-result-police-nss91)

अश्लील साहित्य तयार केले आणि त्याचे प्रसारण केले या आरोपात कुंद्रा आणि त्याचा सहकारी रॉयन थौर्प यांना पोलिसांनी अटक केली आहे. या अटकेला आणि महानगर दंडाधिकारी न्यायालयाने दिलेल्या रिमांडला मुंबई उच्च न्यायालयात कुंद्रा आणि थौर्पने याचिकेद्वारे आव्हान दिले आहे. न्या अजय गडकरी यांच्यापुढे आज यावरील सुनावणी पूर्ण झाली. पोलीसांना आतापर्यंत कुंद्राच्या लैपटॉपमधून 68 व्हिडीओ मिळाले असून अद्याप डिलीट केलेला अन्य डाटा रिकव्हर करण्याचा पोलीस प्रयत्न करीत आहेत, असे प्रमुख सरकारी वकील अरुणा पै-कामत यांनी न्यायालयात सांगितले.

Raj Kundra
मुंबईच्या तलावात येणारे सांडपाणी महापालिका अडवणार, 'हा'आहे प्लॅन

यापूर्वी 51 व्हिडीओ पोलिसांना मिळाले होते. तसेच दोघांना पोलिसांनी पूर्वसूचना देणारी नोटीस बजावली होती. मात्र त्यापैकी कुंद्राने नोटीस घेतली नाही तर थौर्पने नोटीस घेतली असेही यावेळी सांगण्यात आले. हौटशौट आणि बोलीफेमचा कुंद्रा एडमिन आहे आणि त्याच्या लैपटॉपमध्ये अश्लील कथानकाच्या प्रती सापडल्या असा दावा करण्यात आला.

कुंद्राने पुरावे डिलीट केल्याचा आरोप त्याच्या वकिलांनी फेटाळला. पोलिसांनी अटकेआधीच लैपटॉप आणि मोबाईल ताब्यात घेतला होता, मग चैट कसे डिलीट करणार, असा युक्तिवाद एड आबाद पोंडा यांनी केला. थौर्पला नोटीसीला उत्तर देण्यासाठी पुरेसा अवधी देण्यात आला नाही, असे त्याचे वकिल अभिनव चंद्रचूड यांनी सांगितले. सर्व पक्षकारांची बाजू ऐकल्यानंतर न्यायालयाने निकाल राखून ठेवला. दरम्यान, कुंद्राने सत्र न्यायालयात जामिनासाठी अर्ज केला आहे. यावर ता 7 रोजी न्यायालय निकाल देणार आहे.

पोलिसांनी जप्त केलेले व्हिडीओ पोर्नोग्राफी कक्षेत येत नसून ते शौर्ट फिल्म आहेत असा दावा कुंद्राने केला आहे तर तपास करत असताना कुंद्राने व्हौटसप चैट डिलीट केले असा पोलिसांचा आरोप आहे. पोलिसांनी फौजदारी दंड संहिता कलम 41 अ नुसार कुंद्राला अटक केली आहे तर ही अटक बेकायदेशीर आहे असा कुंद्राचा दावा आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com