तळोजा कारागृहात पोर्तुगाल दुतावासाची टिम आणि अबु सालेमची भेट

दीपक घरत
मंगळवार, 12 जून 2018

पनवेल - पोर्तुगाल दुतावासाच्या टिमने मंगळवारी (ता.12) दुपारी 11.45च्या दरम्यान तळोजा मध्यवर्ती कारागृहाचा दौरा केला. यावेळी त्यांनी अंडरवल्ड डॉन अबु सालेमची भेट घेतली आहे. सालेमने पोर्तुगाल लिस्बन कोर्टात भारत प्रत्यार्पण कराराचा भंग करत असल्याची तक्रार केली होती. त्याच्या तक्रारीची दखल घेत पोर्तुगाल दुतावासाच्या टिमने तळोजा मध्यवर्ती काराग्रहात ही भेट घेतली.

भेटी दरम्यान दुतावासाच्या टिम कडून अबु सालेमवर चालू असलेल्या विविध प्रकरणांमध्ये देण्यात आलेल्या निर्णयांबद्दलही चौकशी करणार आली. त्यानंतर ही टीम, महाराष्ट्र, लखनौ, उत्तर प्रदेश आणि दिल्लीला जाणार असून, अबू सालेमशी संबंधित इतर माहितीही घेणार आहे. 

1995 मध्ये बिल्डर प्रदीप जैन हत्या प्रकरण आणि 1993च्या स्फोट प्रकरणामध्ये अबू सालेमला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. खंडणीप्रकरणी दिल्ली न्यायालयाकडून 7 वर्ष जन्मठेपेची शिक्षा झाली आहे. डॉन अबू सालेम तुरुंगातून बाहेर पडण्यासाठी प्रत्यार्पण कराराचा दाखला देत आहे. अबू सालेमला भारताच्या ताब्यात देताना पोर्तुगीज सरकारशी करार करण्यात आला असुन, या करारानुसार भारतामधे अबु सालेमला फाशीची शिक्षा होऊ शकत नाही.

Web Title: portugal embassy team met Abu Salem in taloja jail