esakal | दिवाळीनंतर कोरोनाच्या दुसऱ्या लाटेची शक्यता, हिवाळी अधिवेशन पुढे ढकलणार ?
sakal

बोलून बातमी शोधा

nagpur vidhan bhavan.jpg

दिवाळीत खरेदीसाठी वाढलेली गर्दी आणि कोरोनाची वाढलेली रूग्णसंख्या विचारात घेऊन सरकार निर्णय घेणार असल्याचे बोलले जात आहे. 

दिवाळीनंतर कोरोनाच्या दुसऱ्या लाटेची शक्यता, हिवाळी अधिवेशन पुढे ढकलणार ?

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

मुंबई- विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन नागपुरात येत्या 7 डिसेंबरपासून सुरू होईल, असे विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी काही दिवसांपूर्वी जाहीर केले होते. परंतु, हे अधिवेशन पुढे ढकलण्याची शक्यता निर्माण झाली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दिवाळीत खरेदीसाठी वाढलेली गर्दी आणि कोरोनाची वाढलेली रूग्णसंख्या विचारात घेऊन सरकार निर्णय घेणार असल्याचे बोलले जात आहे. 

कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत ७ डिसेंबरपासून हिवाळी आधिवेशन सुरू होणार होते. मात्र कोरोनाची वाढती आकडेवारी लक्षात घेता सत्ताधारी पक्षाने हिवाळी आधिवेशन पुढे ढकलण्याचा विचार सुरू केला आहे.

हेही वाचा- विराट अनुष्काचा कुत्रा म्हणणाऱ्या नेटकऱ्यांना काँग्रेस प्रवक्त्याचे खडे बोल, म्हणाले...

यापूर्वी आमदार विकास ठाकरे यांनी कोरोनाचा वाढता संसर्ग आणि अपुऱ्या आरोग्य सुविधा या पार्श्वभूमीवर हिवाळी अधिवेशन रद्द करावे. अधिवेशनासाठी लागणारा निधी कोरोनाच्या आरोग्य सुविधांसाठी करावा, अशी मागणी केली होती.  नागपुरात हिवाळी अधिवेशनादरम्यान करोनापासून संरक्षण करण्यासाठी विधिमंडळात ‘निगेटिव्ह प्रेशर’ची सोय करण्यात आल्याचे नाना पटोले यांनी सांगितले होते. त्यामुळे विधिमंडळ सदस्यांचा कोरोनापासून बचाव होऊ शकतो, असेही ते म्हणाले होते. 

हेही वाच- बिहार निवडणुकीवेळी राहुल गांधी सिमल्यात मजा करत होते, आरजेडी नेत्याचा आरोप

दरम्यान, नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यात कामकाज सल्लागार समितीची पुन्हा बैठक होणार आहे. या बैठकीत कोरोना आकडेवारीचा विचार करून अधिवेशन घ्यायचे की पुढे ढकलायचे याबाबत विचार केला जाणार असल्याचे सांगितले जात आहे. 

loading image