Lockdown : मद्यविक्रीला परवानगी मिळाल्यानंतर समाजमाध्यमांवर भन्नाट पोस्ट आणि कमेंट व्हायरल, वाचा

liquor store
liquor store
Updated on

ठाणे : राज्य सरकारने संचारबंदीदरम्यान काही अटीशर्थीवर मद्याची दुकाने सुरू करण्याला मुभा दिल्याने मद्यपींच्या आनंदाला उधाण आले आहे, तर काहींनी या विषयी नाराजीही व्यक्त केली आहे. काही ही असले, तरी सध्या सोशल मिडियावर मात्र जाम पे चर्चा चांगलीच रंगली आहे. यामुळे अनेकांच्या कल्पनाशक्तीला धुमारे फुटले असून याविषयीचे भन्नाट मेसेज मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. यातीत काही मेसेज मनोरंजनाबरोबरच डोळ्याच अजंन घालणारे असून सध्या ते आवर्जुन वाचले जात आहेत.      

राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सरकारतर्फे विविध उपाययोजना राबवल्या जात आहेत. याच पार्श्वभूमीवर राज्यात टाळेबंदी लागू केल्यामुळे अत्यावश्यक सेवेतील दुकानांव्यतिरिक्त इतर सर्व दुकाने बंद ठेवण्याचे निर्देश देण्यात आले होते. यामध्ये मद्याच्या दुकानांचा देखील समावेश होता. त्यामुळे काहींची चांगलीच पंचाईत झाली होती. त्यात टाळेबंदीच्या काळात छुप्या पद्धतीने मद्याची विक्री करण्यात येत होती, मात्र, मद्याच्या गगणाना भिडणाऱ्या दरामुळे अनेकांच्या खिशाला ते परवडणारे नव्हते. त्यामुळे इच्छा असूनही मद्याची खरेदी करता येत नव्हती. त्यामुळे मद्यपींमध्ये निराशाचे वातावरण पसरले होते. टाळेबंदीच्या काळात अनेकदा मद्याची दुकाने सुरु होण्याबाबत अफवा वेगाने पसरत होत्या, मात्र, रविवारी सरकारने मद्याची दुकाने आजपासून (ता. 4) अटीशर्तीवर व नियमावली नुसार सुरु करण्याबाबत आदेश जारी केल्याने मद्यपींच्या आनंदाला उधान आले आहे.  दरम्यान, रविवारपासून समाज माध्यमांवर याविषयी चर्वितचर्वण जोरात सुरू आहे. 

समाजमाध्यमांवरील भन्नाट मेसेज

  • जर कोणी दारू आणायला जात असेल तर, टाळ्या वाजवून त्याचा उत्साह वाढवा, कारण तो अर्थव्यवस्था मजबूत करायला निघाला आहे. 
  • प्रिय, तळीरामांनो मी पुन्हा येतेय, मी पुन्हा येतेय... तुमची लाडकी मदिरा.
  • उठ बेवड्या जागा हो, अर्थव्यवस्थेचा धागा हो
  • मद्याच्या दुकानात मद्य घेणाऱ्याचा फोटो टाकून त्यावर पहिला भाग्यवान विजेता, अशी फोटो ओळ

post goes viral on social media after permission to sell alcohol

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com