सुशांतसाठी मुंबईत लागलेत पोस्टर्स; "मी तुमच्यापैकीच एक होतो, मी देखील न्यायासाठी पात्र" #JusticeForSushant

सुमित बागुल
Saturday, 26 September 2020

मुंबईतील विविध भागांमध्ये असे पोस्टर्स लागलेत. मात्र हे पोस्टर्स कुणी लावलेत याबाबत अद्याप माहिती मिळू शकलेली नाही. 

मुंबई : १४ जून रोजी सुशांतच्या मृत्यू झाला होता. अभिनेता सुशांत सिंह राजपूत मृत्यूनंतर सुशांतने आत्महत्या केलीये का त्याची हत्या झाली हा प्रश्न उपस्थित झाला. या प्रकरणी सुरवातीला मुंबई पोलिस तपास करत होते. त्यानंतर सुशांतच्या वडिलांनी बिहारमध्ये FIR दाखल केल्यानंतर सुशांतच्या मृत्यूची चौकशी कोण करणार याबाबत वाद निर्माण झाला. पुढे हा वाद सुप्रीम कोर्टात गेला. अखेर सुप्रीम कोर्टाने सुशांतच्या मृत्यूच्या चौकशी आणि तपासाची धुरा CBI कडे सोपवली. CBI कडून मुंबईत तपास सुरु आहे.  त्याचा पहिला टप्पा संपवून CBI ची टीम दिल्लीत परतली आहे. 

महत्त्वाची बातमी : बायको उचलतेय खर्च, खटला लढवण्यासाठी विकावे लागतायत दागिने, अनिल अंबानींचा कोर्टात दावा

खरंतर सुशांतच्या मृत्यूनंतर ती हत्या होती की आत्महत्या अद्याप स्पष्ट झालेलं नाही. या दरम्यान सोशल मीडियावर सुशांतच्या समर्थनार्थ अनेक मोहिमा राबवल्या  गेल्यात आजही अशा मोहीमा सुरु आहेत.  

#JusticeForSushant  #CBIforSushant असे हॅशटॅग देखील सोशल मीडियात चांगलेच व्हायरल झालेत, ट्रेंड झालेत. याच्याच पुढे जाऊन आता मुंबईत सुशांतला न्याय मिळवून देण्यासाठी मुंबईत पोस्टर मोहीम सुरु झालीये. मुंबईतील रस्त्यावर काही पोस्टर लागलेत. यामध्ये  'मी तुमच्यापैकीच एक होतो. तुम्ही न्यायासाठी पात्र आहात? तसाच मी देखील न्यायासाठी पात्र आहे. #JusticeForSushant असं लिहिण्यात आलंय.  

मुंबईतील विविध भागांमध्ये असे पोस्टर्स लागलेत. मात्र हे पोस्टर्स कुणी लावलेत याबाबत अद्याप माहिती मिळू शकलेली नाही. 

posters in mumbai stating justice for sushant singh rajput


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: posters in mumbai stating justice for sushant singh rajput