पोस्टमन भरतीला स्थगिती

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 11 ऑगस्ट 2016

मुंबई - टपाल खात्यातील पोस्टमन आणि "मल्टी टास्किंग स्टाफ‘ (एमटीएस) या पदांवरील भरतीला "ब्रेक‘ लागला आहे. भरती प्रक्रियेत अनियमितता आढळल्याने नेमणुकीला स्थगिती देण्यात आली आहे. मुख्य पोस्टमास्तर जनरल यांची नेमणूक होईपर्यंत दोन हजार जागांची भरती लांबणीवर पडण्याची चिन्हे आहेत. 

तब्बल एक हजार 200 पोस्टमन आणि 800 "एमटीएस‘ पदांसाठी टपाल खात्याने गेल्या वर्षी भरती प्रक्रिया सुरू केली होती. त्यासाठी त्रयस्थ खासगी एजन्सीचीही नेमणूक झाली होती; मात्र अनियमितता आढळल्याने मुख्य पोस्टमास्तर जनरल ए. के. दास यांनी नेमणुकांवर स्थगिती आणली असून दक्षता विभागामार्फत चौकशीचा आदेश दिला आहे. अनेक टपाल कार्यालयांत "एमटीएस‘ आणि पोस्टमन या पदांसाठी निवड झालेले उमेदवार रूजू झाल्यानंतर त्यांच्या नेमणुकांवर स्थगिती आल्याने मोठा गोंधळ उडाला आहे.
 
टपाल खात्याच्या या निर्णयाविरुद्ध गेल्या आठवड्यात आझाद मैदानावर निदर्शने करण्यात आली. त्यानंतर अनेक उमेदवार आणि त्यांच्या पालकांनी मुख्य पोस्टमास्तर जनरल यांच्या कार्यालयावर धडक दिली होती. त्यामुळे आता मुख्य पोस्टमास्तर जनरल यांच्या कार्यालयाला कडक सुरक्षाव्यवस्था देण्यात आली आहे.

उमेदवारांना करावी लागणार प्रतीक्षा
ए. के. दास यांना टपाल विभागाच्या सदस्यपदी बढती मिळाल्याने त्यांच्यावरील मुख्य पोस्टमास्तर जनरल या पदाचा भार कमी झाला आहे. त्यामुळे नवीन पोस्टमास्तर जनरल येईपर्यंत पोस्टमन आणि "एमटीएस‘ पदांवरील नेमणुकांसाठी उमेदवारांना वाट पाहावी लागणार आहे. 

Web Title: Postman recruitment stayed