ऐरोली स्थानकाच्या प्रवेशद्वाराजवळ खड्डा

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 23 जुलै 2018

तुर्भे - ठाणे-वाशी ट्रान्स हार्बर मार्गावरील ऐरोली रेल्वेस्थानकाच्या प्रवेशद्वारावरील कलवटचा काही भाग खचल्याने तेथे खड्डा पडला आहे. त्यामुळे वाहनचालक आणि पादचाऱ्यांना तेथून ये-जा करताना कसरत करावी लागत आहे. 

ऐरोली रेल्वेस्थानकातून ठाणे-बेलापूर मार्गाकडे जाताना ठाण्याच्या दिशेकडे गेट आहे. त्याच्या जवळ चार दिवसांपूर्वी पावसामुळे खड्डा पडला आहे. या ठिकाणी कलवटचा भाग खचला आहे. या खड्ड्यामुळे रिक्षाचालक आणि प्रवाशांना रात्री जपून ये-जा करावी लागते. येथे अनेक जण ठेचकळून पडले आहेत. दिघा, मुकंद कंपनी, यादवनगर येथील कामगार व नागरिकांची या मार्गावरून ये-जा सुरू असते. तेथे अनेक जण ठेचकळून पडल्याच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे सध्या तेथे झाडांच्या फांद्या टाकल्या आहेत. परंतु त्यानंतरही येथे नागरिकांना पडून जखमी होण्याचा धोका कायम आहे. 

ऐरोली रेल्वेस्थानकाच्या गेटसमोर पडलेला हा खड्डा बुजवण्यासाठी सिडको आणि पालिका आपली जबाबादारी नसल्याचे सांगत टाळाटाळ करत आहेत. या खड्ड्यात पडून अपघात झाल्यावर त्यांना जाग येणार का? हा खड्डा बुजवला नाही तर आंदोलन केले जाईल.
- अमित पद्माकर, संभाजी ब्रिगेड

Web Title: pothole near AIROLI railway station