ठाणे मनपा आयुक्तांना अल्टिमेटम, पुढील चार दिवसात खड्डे बुजवा नाहीतर...

ठाणे मनपा आयुक्तांना अल्टिमेटम, पुढील चार दिवसात खड्डे बुजवा नाहीतर...

मुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुंबई, ठाण्यात अदयाप सर्व काही खुलं करण्यात आलेलं नाही. ठाण्यात सम विषम सुत्रानुसारच दुकानं खुली करण्यात आली आहेत. कोरोनाच्या  पार्श्वभूमीवर एप्रिल ते ऑगस्ट महिन्यात या आधीच्या वर्षांच्या तुलनेत रस्त्यांवर वाहनांची वर्दळ कमीच होती. अजूनही रस्त्यावरील वाहनांची वर्दळ तुलनेने कमीच आहे. मात्र असं असलं तरीही ठाण्यातील रस्त्याची सालाबादप्रमाणे चाळण झाल्याचं पाहायला मिळतंय.

दरवर्षी पाऊस पडतो आणि रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात खड्डे पडतात. अशात आता गणेशोत्सव अवघ्या चार दिवसांवर येऊन ठेपलाय. या पार्श्वभूमीवर ठाण्यातील काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी आक्रमक भूमिका घेतलीये. येत्या चार दिवसात ठाण्यातील रस्त्यांवरील खड्डे तातडीने बुजवा, नाहीतर कॉंग्रेस रस्त्यावर उतरुन खड्यांविरोधात आंदोलन केलं जाईल, असा इशारा कॉंग्रेसचे प्रदेश सदस्य राजेश जाधव यांनी महापालिका प्रशासनाला दिलाय. 

गेले काही दिवस ठाण्यात सतत पाऊस कोसळतोय. सातत्याने कोसळणाऱ्या पावसामुळे ठाण्यातील मुख्य चौक तीन हात नाका, माजिवडा चौक, कापूरबावडी चौक या ठिकाणी खड्ड्यांचे साम्राज्य आहे. सोबतच तीन हात नाक्यावरील उड्डाण पूल, नितीन कंपनीसमोरील उड्डाण पूल, सोबतच घोडबंदर रोडवरील वाघबीळ, पातलीपाडा, मानपाडा आणि कापुरबावडी उड्डाण पुलांवर खड्डे पडलेत. या खड्ड्यांमुळे मोठा अपघात घडण्याची शक्यता आहे त्यामुळे ठाण्यातील रस्त्यांवरील आणि MSRDC च्या अखत्यारीतील उड्डाण पुलांवरील खड्डे बुजवण्याची मागणी करण्यात येतेय. 

ठाणे शहरात दरवर्षी खड्डे बुजवण्यासाठी मोठ्या प्रमाणात पैसा खर्च करण्यात येतो. यंदाही खड्डे बुजवण्यासाठी २ कोटीहून अधिकची तरतूद केली आहे. मात्र वारंवार खड्डे बुजवून देखीलही ठाण्यातील रस्त्यांवर खड्ड्यांचं साम्राज्य पाहायला मिळतंय. यासाठी काँग्रेसकडून महापालिका आयुक्त आणि पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी पत्रव्यवहार करून खड्डे बुजवण्याची मागणी केली जातेय. रस्त्यांवरील खड्डे येत्या चार दिवसात बुजवले नाहीत तर काँग्रेसकडून आंदोलन केलं जाणार आहे.  

potholes on the road thane congress party workers gave ultimatum to TMC commissioner

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com