कोरोनाच्या संकटातून निर्माण झाली संधी, समुद्र प्रदूषण टाळण्यातही खारीचा वाटा

कृष्ण जोशी
Monday, 16 November 2020

हे सारे घट एकत्रित करून खाडीत किंवा किंवा समुद्रात विसर्जन करणे त्यांनाही शक्य होते. पण मुळात पर्यावरणप्रेमी आणि वृक्षप्रेमी असलेल्या देहरकर यांनी त्याऐवजी त्यात झाडे लावायचे ठरवले. 

मुंबई : नवरात्रीत कित्येक घरांमध्ये घट बसवून त्यांची पूजा केली जाते, नंतर त्यांचे समुद्रात विसर्जन होते. मात्र इराणीवाडीच्या नगरसेविका लीनाबेन पटेल देहरकर यांच्या प्रयत्नांनी या घटांमध्ये विविध झाडे लावून ते घट पुन्हा भाविकांना देण्यात आले. यामुळे हे घट समुद्रार्पण होणे टळल्याने जलप्रदूषणही झाले नाही. एरवी भाविकांकडून नवरात्र संपल्यावर हे घट मंदिरात आणून ठेवले जातात व मंदिरातर्फे त्यांचे समुद्रात विसर्जन केले जाते. पण यावर्षी कोरोनामुळे सारी मंदिरे बंद असल्याने या घटांचे करायचे काय या विचारातून श्रीमती पटेल देहरकर यांना ही कल्पना सुचली.

महत्त्वाची बातमी :  खड्डे मुक्त रस्त्यांसाठी नवा प्रयोग, मुख्य रस्त्यावर भूमिगत सुविधांसाठी डक्ट

हे सारे घट एकत्रित करून खाडीत किंवा किंवा समुद्रात विसर्जन करणे त्यांनाही शक्य होते. पण मुळात पर्यावरणप्रेमी आणि वृक्षप्रेमी असलेल्या देहरकर यांनी त्याऐवजी त्यात झाडे लावायचे ठरवले. 

मुळच्या गुजरातीभाषक असलेल्या देहरकर यांना या समस्येची कल्पना आधीच आली होती. त्यामुळे त्यांनी घटस्थापनेच्या दिवशीच महापालिका आयुक्तांना त्याची कल्पना देऊन एकतर मंदिरे उघडा किंवा हे घट गोळा करण्याची केंद्रे स्थापन करा असे सांगितले. त्यानुसार महापालिकेने निर्माल्य संकलन केंद्र या शीर्षकाखाली या उपक्रमाला परवानगी दिली व त्यासाठी चारकोप-कांदिवलीच्या इराणीवाडी महापालिका शाळेत जागा दिली. त्यानंतर देहरकर यांनी आपल्या संपर्कातील भाविकांना नवरात्रीनंतर घट येथे आणण्यास सांगितले. त्यानुसार बोरीवली, कांदिवलीतील भाविकांनी 2,300 घट आणून दिले. 

महत्त्वाची बातमी : बिहारमध्ये भाजपने शब्द पाळला, महाराष्ट्रात शिवसेनेला शब्द दिलाच नव्हता; प्रवीण दरेकरांची प्रतिक्रीया

महापालिकेने त्यांना दोन ट्रक माती आणि सहाशे झाडे दिली, उरलेली माती व झाडे देहरकर यांनी स्वखर्चाने आणली.  सहकार्यांनी या सर्व घटांमध्ये माती भरून त्यात झाडे लावली. तुळस, लिली, पाम, बांबू व अन्य फुलझाडे लावण्यात आली व भाविकांना हे घट घरी नेण्यास सांगण्यात आले. भाविकांनीही अत्यंत उत्साहाने हे घट घरी नेले. नंतर वाटले तर ही झाडे मैदानात लावता येतील, अशीही कल्पना आहे. 

( संपादन -  सुमित बागुल )

pots used for navratri are reused for tree planation opportunity amid corona


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: pots used for navratri are reused for tree planation opportunity amid corona