

Powai Crime
ESakal
मुंबई : मुंबईत पवई येथे एका २८ वर्षीय तरुणाने तृतीयपंथी बनून एका महिलेच्या घरात घुसून तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. नजर उतरवण्याच्या बहाण्याने महिलेच्या घरात येत तिच्या बेडरूममध्ये घुसून आरोपीने महिलेवर जबरदस्ती करत घृणास्पद कृत्य केले. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी आरोपीला अटक करण्यात आली आहे.