सिध्दार्थ कॉलनी अंधारात! अदानी वीज कंपनीचा मनमानी कारभार संतप्त रहिवाशांचा रास्ता रोको! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Power supply cut off to Siddharth Colony Residents agitation against Adani Power Company

सिध्दार्थ कॉलनी अंधारात! अदानी वीज कंपनी विरोधात संतप्त रहिवाशांचा रास्ता रोको!

मुंबई - वीज बिल दर महिना भरत असताना देखील वीज बिल थकीत असल्याचे कारण देत अदानी वीज कंपनी गेल्या कित्येक महिन्यापासून सिध्दार्थ कॉलनीची वीज खंडित करीत असल्याच्या निषर्धात संतप्त रहिवाशांनी आज रात्री सायन ठाणे मार्गावर रास्ता रोको करून आंदोलन केले.

चेंबूर येथील घाटकोपर सायन मार्गावर असलेली सिध्दार्थ कॉलनी आंबेडकरी चळवळीचा बालेकील्ला म्हणून पहिला जातो. या कॉलनीत 3500 पेक्षा अधिक घर आहेत. 2005 पासून या कॉलनीचा विकास करण्याकरिता काही कार्यकर्त्यांनी स्वतःची झोळी भरण्याकरिता एका आरपीआय नेत्याला घेऊन आले होते. त्या विकासकाने विकास केला नाहीच मात्र कित्येक विकासक कॉलनीच्या माथ्यावर मारले आहे.

या विकासकांनी घरधारकांना थकीत बिल भरण्याचे आश्वासन ही दिले होते. आज हे वीज बिल एकूण 109 करोड च्या घरात गेले आहे. अदानी वीज कंपनी इतर विभागातील रहिवाशांचे वीज बिल सिध्दार्थ कॉलनीतील रहिवाशांच्या माथी मारत आहे. अदानी वीज कंपनी आपले वीज वसूल करण्याकरिता सतत वीज बिल खंडित करून रहिवाशांना अंधारात ठेवून अन्याय करीत आहे. या अन्याया विरोधात रहिवाशांनी अदानी वीज कंपनी, तहसीलदार कार्यालय व पोलीस ठाण्यावर कित्येकदा मोर्चे काढले होते. शेवटी पोलिसांनी मध्यस्थी केली.

रहिवाशांनी मागील वीज बिल तसेच ठेवून 2019 रोजी पासून चालू महिन्याचे वीज भरायचे नेहमीच्या वीज बिल भरल्यानंतर वीज या पुढे खंडित करण्यात येणार नाही असे अश्वासन दिले होते. आज पर्यंत काही घरधारक नियमित पणे वीज बिल भरीत असताना देखील अदानी वीज कंपनी वीज खंडित करीत आहे. अदानी वीज कंपनी रात्री ठीक. 1 वाजण्याच्या सुमारास वीज खंडित करते तर कधी कधी पहाटे ठीक. 3 ते 4 वाजण्याच्या सुमारास वीज खंडित करून संध्याकाळी ठीक. 6 वाजण्यास पूर्ववत करते त्यामुळे सामान्य रहिवाशांना नाहक त्रास व विविध आजारांना सामोरे जावे लागत आहे. सतत रात्री व पहाटे वीज खंडित होत असल्याने कॉलनीत मोठया प्रमाणात चोरीचे प्रमाण वाढले आहे.

सिध्दार्थ कॉलनीतील कित्येक रहिवाशांचे हातावरचे पोट आहे. वीज खंडित होत असल्याने शाळेत जाणाऱ्या विद्यार्थीना अभ्यास करायला मिळत नाही. झोप पूर्ण होत नाही त्यामुळे विद्यार्थी, जेष्ठ नागरिक, गरोदर महिला यां विविध आजाराला बळी पडत आहेत. या त्रासा बद्दल रहिवाशांनी सतत अदानी वीज कंपनी व विकासकांच्या विरोधात निदर्शने केली आहे. नवीन विकासक शोधात आहेत. याबाबत अदानी वीज कंपनीच्या अधिकारी यांच्याशी चर्चा झालेली आहे. व्याजावर व्याज लावून वीज बिल लादत अदानी वीज कंपनी मनमानी कारभार करीत आहे. यापूर्वी ज्या ग्राहकाचे वीज बिल थकीत होते त्याचे मीटर अदानी अधिकारी येऊन मीटर कापून घेऊन जात होते मात्र आता तसे न करता वीज बिल भरणा करण्याऱ्याची तब्बल 16 ते 17 तास वीज खंडित करून रहिवाशांना अंधारात ठेवत आहेत.

या संतप्त रहिवाशांनी आज सायन ठाणे मार्गावर येऊन रास्ता रोको केला त्यामुळे दोन्ही मार्गावरील वाहतूक दोन ते तीन तास ठप्प झाली होती.झोन 6 चे पोलीस उपायुक्त, सहाययक पोलीस आयुक्त, वरिष्ठ पोलीस निरीक्षक व पोलिसांनी येऊन आंदोलन कर्त्याची समजूत घातली परंतु आमचा निर्णय होत नाही तो पर्यंत आम्ही हटणार नसल्याचे आंदोलकांनी सांगितले. आमच्या वर होणाऱ्या अन्याया बाबत राज्याचे मुख्यमंत्री व उपमुख्य मंत्री यांनी लक्ष घालून आम्हाला न्याय द्यावा, अशी मागणी रहिवाशांनी केली आहे.

वीज बील नेहमीत भरत आहे तरी सुद्धा अदानी कंपनीचे अधिकारी मनमानी कारभार करीत वीज खंडित करीत आहे. अदानी कंपनीचे अधिकारी पूर्वी ज्या घरधारक वीज बिल भरत नव्हते त्या घरधारकांचे पोलिसांसह येऊन मीटर कापून घेऊन जात होते. आम्ही वीज बील भरत असताना आमची वीज खंडित केली जात आहे हा मोठा गुन्हा करीत आहे.

- श्वेता लोखंडे. रहिवाशी.

मी विद्यार्थी आहे. सतत वीज खंडित होत असल्याने घरी अभ्यास करता येत नाही. झोप पूर्ण होत नाही. त्यामुळे सतत डोके जड होऊन शाळेत झोप येते. या वर्षी या अदानी व विकासकांच्या वीज लपडवा मुळे आमचा बळी जाणार हे सत्य आहे. स्वतंत्र देशात आमच्यावर आजही अन्याय केला जात आहे. अन्याय दूर झाला नाही तर आम्ही जगायचे कसे असा प्रश्न डोळ्यासमोर उभा राहत आहे.जाणून बुजून अदानी वीज कंपनी अधिकारी विकासकांच्या संगनमताने छळ करीत आहे.

- शुभम भोसले, विद्यार्थी.

Web Title: Power Supply Cut Off To Siddharth Colony Residents Agitation Against Adani Power Company

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..