डोंबिवली : शहरातील गरिबाचा वाडा, महाराष्ट्र नगर, गोपीनाथ चौक परिसर आदी भागात सकाळ-संध्याकाळ सातत्याने दीड ते दोन तास वीज पुरवठा खंडीत होत आहे. सातत्याने सुरु असलेल्या या विजेच्या लपंडावाने नागरिक हैराण झाले आहेत. वीज पुरवठा खंडित झाल्यास महावितरणच्या संपर्क क्रमांकावर संपर्क साधला असता तेथील दुरध्वनी उचचला जात नाही, त्यामुळे नागरिक आणखी त्रस्त होत आहेत.