

Pradeep Purnekar Case
ESakal
ठाणे : प्रदीप पूर्णेकर यांच्या हत्या प्रकरणात तपासातून नवनवीन माहिती समोर येत आहे. हत्येच्या दिवशी नेहमी चप्पल घालणारा सुभाष उर्फ पप्या शिंदे शूज घालून कार्यालयात आला होता. पूर्णेकर यांच्या केबिनचा दरवाजा उघडा ठेवता यावा, यासाठी त्याने शूज न काढताच केबिनमध्ये प्रवेश केल्याची माहिती पोलिस तपासातून गुरुवारी (ता. १५) समोर आली आहे.