प्रगती एक्‍स्प्रेस आजपासून नव्या रूपात 

प्रगती एक्‍स्प्रेस आजपासून नव्या रूपात 

मुंबई : मुंबई-पुणे-मुंबई अशी धावणारी "प्रगती एक्‍स्प्रेस' आता नवीन रूपात रेल्वे मार्गावर धावताना दिसणार आहे. रेल्वे पूर्णपणे सुशोभीत करून ती रविवारी प्रवाशांसाठी खुली केली जाणार आहे. अगदी घर असल्याचा भास या रेल्वेने प्रवास करताना होणार आहे. 

प्रगती एक्‍स्प्रेसच्या डब्यांना बाहेरून रंगरंगोटी करण्यात आली असून सामान्य डबेही आतमधून सुशोभीत करण्यात आले आहेत. प्रवाशांना सामान ठेवण्यासाठी व्यवस्था करण्यात आली आहे. प्रवाशांना स्थानकांची आणि इतर माहिती मिळावी यासाठी डब्यांमध्ये ऑनलाईन माहिती प्रणाली लावण्यात आली आहे. त्याचप्रमाणे एसी डबेही सुशोभीत करण्यात आले आहेत. डब्यातील स्वच्छतेच्या दृष्टीने महत्त्वाच्या सुविधा पुरविण्यात आल्या आहेत. यामध्ये डब्यात आणि शौचालयांमध्ये ही फ्रेशनर्स बसवण्यात आले. डब्यांमधील प्रवाशांच्या खुर्च्यासुद्धा सरकत्या असणार आहेत. खुर्च्यांना नवे कव्हर लावण्यात आले असून बेसीन आणि इतर सुविधाही देण्यात आल्या आहेत. एसीतील शौचालयांचीही रचनेतही काही बदल करण्यात आले आहेत. त्यामुळे या एक्‍स्प्रेसमध्ये प्रवास करताना प्रवाशांना घरी असल्याचा भास होणार आहे. 

प्रगती एक्‍सप्रेसमधील बदल 
- डब्यांना रंगरंगोटी केली 
- प्रवाशांच्या माहितीसाठी पोस्टर्स 
- माहितीचे स्टिकर्स लावले 
- शौचालयात स्वदेशी रचनेची व्हेंटिलेशन खिडकी 
- एसी डब्यातील खिडक्‍यांवर पडदे 
- प्रवाशांसाठी माहिती प्रणाली सुविधा. 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com