प्रज्ञासिंह हाजिर हो!

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 18 मे 2019

अर्ज नामंजूर
प्रज्ञासिंह ठाकूर भोपाळमधून भाजपच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढवत आहेत. वैद्यकीय उपचारांच्या कारणासाठी त्यांनी जामिनाची मागणी केली होती. मालेगाव बाँबस्फोटामुळे बाधित नागरिकांनी त्यांना निवडणूक लढवण्यास विरोध करणारा अर्ज न्यायालयात केला होता. तो नामंजूर करण्यात आला.

मुंबई - मालेगाव बाँबस्फोटातील प्रमुख आरोपी प्रज्ञासिंह ठाकूर व अन्य सात आरोपी सुनावणीला गैरहजर राहिल्याबद्दल विशेष न्यायालयाने शुक्रवारी नाराजी व्यक्त केली. आरोपींनी आठवड्यातून एकदा सुनावणीला हजर राहावे, असा आदेश न्यायालयाने दिला.

विशेष न्यायालयात मालेगाव बाँबस्फोटप्रकरणी खटला सुरू आहे. प्रज्ञासिंह ठाकूर, लेफ्टनंट कर्नल प्रसाद पुरोहित, समीर कुलकर्णी, रमेश उपाध्याय, सुधाकर चतुर्वेदी, सुधाकर द्विवेदी, अजय राहिरकर आणि संदीप डांगे हे आरोपी आहेत. जामीन मिळालेले आरोपी सुनावणीला हजर राहत नसल्याबद्दल विशेष न्यायाधीश विनोद पाडाळकर यांनी नाराजी व्यक्त केली. ‘‘जामिनावर असलेल्या आरोपींनी सुनावणीला हजर राहिले पाहिजे.

आरोपी वेगवेगळी कारणे काढून जामीन घेतात आणि सुनावणीला हजर राहत नाहीत. त्यांचे वकीलही सुनावणीला गैरहजर राहण्याच्या परवानगीसाठी न्यायालयाकडे अर्ज करतात,’’ असे खडे बोल न्यायालयाने सुनावले. खटल्याची पुढील सुनावणी २० मे रोजी आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: pragya singh Accused Malegaon bomb blast case court