Prakash Ambedkar: 'काळ्या दगडावरची रेघ, 2024 मध्ये मोदी पंतप्रधान नसतील; प्रकाश आंबेडकरांचा दावा

२०२४ मध्ये नरेंद्र मोदी पंतप्रधान नसतील, ही काळ्या दगडावरची रेघ आहे, असा दावा वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी केलाय
modi prakash ambedkar
modi prakash ambedkaresakal

मुंबई- २०२४ मध्ये नरेंद्र मोदी पंतप्रधान नसतील, ही काळ्या दगडावरची रेघ आहे, असा दावा वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी केलाय.आंबेडकर यांनी पत्रकाराशी बोलताना भाजप, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाहा यांच्यावर शाब्दिक हल्ला केला. देश परत एकदा फाळणीच्या दिशेने जात आहे, असं ते म्हणाले. (prakash ambedkar criticize bjp rss narendra modi will not be prime minister in 2024)

मला केंद्रीय गृहमंत्री अमित शाहा यांच्या बुद्धीची किव करावीशी वाटते, कारण भारतीय जनता पक्ष १९५० मध्ये नव्हता. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना १९२२-२३ मध्ये झालीये. अमित शाहांनी मला सांगावं की ते अर्धी चड्डी घालून आरएसएसच्या शाखेत गेलेत का? आरएसएसचा स्वातंत्र्याचा इतिहास नाही. ते ब्रिटिशांचे हस्तक म्हणून राहिले, असं आंबेडकर म्हणाले.

modi prakash ambedkar
WI vs IND : 'अच्छा चलता हूं दुआओं में याद रखना', विजयानंतर KL राहुल अन् इशान किशनवर मीम्स व्हायरल

पाकिस्तानचा १४ ऑगस्ट स्वातंत्र्य दिवस आहे.मी हा इतिहास सांगतोय कारण, फाळणीची जखम भरुन निघालेली आहे. पण, आता खपल्या काढण्याचा प्रयत्न सुरु आहे. १५ ऑगस्ट निमित्ताने प्रत्येक गावामध्ये एक दगड लावण्याचं काम सुरु झालं आहे. हे पंतप्रधान मोदींचेच काम आहे. भाजप आणि नरेंद्र मोदी यांना देशाची पुन्हा फाळणी करायची आहे का? भाजप, आरएसएस आणि मोदी यांचे राजकारण आता देशाच्या फायद्याचे नाही, असं मत त्यांनी व्यक्त केले.

modi prakash ambedkar
Manipur Violence : विरोधकांचा चर्चेपासून पळ : मोदी

सरकार कोणाचं येईल हे मी सांगू शकत नाही. पण, २०२४ मध्ये मोदी पंतप्रधान राहणार नाहीत, ही काळ्या दगडावरची रेघ आहे. पंतप्रधान मोदी यांचा आत्मविश्वास गेल्यासारखं वाटतंय. अविश्वास प्रस्तावावर बोलताना पंतप्रधान मोदी यांच्यात आत्मविश्वास दिसत नव्हता. पूर्वीच्या भाषणाप्रमाणे त्यांचं हे भाषण नव्हतं, असं प्रकाश आंबेडकर म्हणाले. (Latest Marathi News)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com