'वंचित'चा उद्याचा शांती मोर्चा स्थगित; प्रकाश आंबेडकरांची माहिती

Prakash Ambedkar
Prakash Ambedkarsakal

मुंबई : भाजपच्या निलंबित प्रवक्त्या नुपूर शर्मा यांनी प्रेषित मोहम्मद पैगंबर यांच्या विषयी केलेल्या वक्तव्याच्या विरोधात उद्या मोर्चा काढण्याचा निर्णय वंचित आघाडीकडून घेण्यात आला होता मात्र, उद्याचा हा शांती मार्च स्थगित केल्याची माहिती प्रकाश आंबेडकरांनी दिली आहे.

प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वात मुंबईत उद्या शांती मार्च काढण्यात येणार होता, मात्र तो आता स्थगित करण्यात आला आहे. यावर बोलताना राज्याचे गृहमंत्री वळसे पाटील म्हणाले की, उद्याचा मोर्चा संदर्भात त्यांच्याशी चर्चा झाली त्यातील वंचितच्या दोन मागण्या होत्या, आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्यांवर कारवाई व्हावी आणि दुसरी मागणी अपशब्द वापरून जाणिवपुर्वक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातो, त्याबाबत सगळ्यांची बैठक घेऊन चौकशी करून योग्य तो निर्णय घेण्यात येईल असे वळसे पाटील यांनी सांगितले.

त्यानंतर वंचित बहुजन आघाडीच्या दोन मागण्या मान्य झाल्या असून, सरकारने हा विषय गांभिर्याने घेतला त्यामुळे उद्याचा मोर्चा स्थगित केल्याचे प्रकाश आंबेडकर यावेळी म्हणाले. उद्या एका ठिकाणी पोलिस आयुक्त सांगतिल त्या जागी बैठक घेण्यात येईल संबंधितांमध्ये याबद्दल जागृती करण्यात येईल असे आंबेडकर यावेळी म्हणाले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com