राहुल गांधी यांचा खोटारडेपणा सिद्ध - जावडेकर

राहुल गांधी यांचा खोटारडेपणा सिद्ध - जावडेकर

मुंबई - "राफेल' विमान खरेदीबाबत केलेल्या वक्तव्याबद्दल सर्वोच्च न्यायालयाकडे दिलगिरी व्यक्त केल्यामुळे कॉंग्रेस पक्ष व त्याचे अध्यक्ष राहुल गांधी यांचा खोटारडेपणा सिद्ध झाला आहे, अशी प्रतिक्रिया केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री प्रकाश जावडेकर यांनी सोमवारी मुंबईत व्यक्त केली. 

भाजपच्या प्रदेश कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. या वेळी मुख्यालय प्रभारी प्रतापभाई आशर व प्रदेश प्रवक्ते केशव उपाध्ये उपस्थित होते. 

जावडेकर म्हणाले, की "राफेल'बाबतच्या फेरविचार याचिकेवर सुनावणी घेण्याची तयारी सर्वोच्च न्यायालयाने दर्शविल्यानंतर राहुल गांधी यांनी, "राफेल'बाबत चोरी झाली आहे व चौकीदार चोर आहे, हे न्यायालयानेही मान्य केले, असे म्हटले होते. त्याबाबत अवमान याचिका दाखल झाल्यावर न्यायालयाने राहुल गांधी यांना नोटीस बजावली. अखेर राहुल गांधी यांनी दिलगिरी व्यक्त केली. कॉंग्रेस म्हणजे खोटारडेपणा आणि "राफेल' म्हणजे "राहुल फेल' हे या निमित्ताने दिसून आले. 

ते म्हणाले, की गेली पाच वर्षे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारवर भ्रष्टाचाराचा एकही डाग नसल्यामुळे निराश झालेल्या राहुल गांधी यांनी पुनःपुन्हा खोटारडा प्रचार चालू केला. पण, अशा खोटारडेपणामुळे कधीही सत्याचा पराभव होऊ शकत नाही. वारंवार खोटे बोलण्यामुळे कॉंग्रेसची विश्वासार्हता मात्र संपत आहे. 

बारामती, नांदेड जिंकू 
लोकसभा निवडणुकीच्या मतदानाचे दोन टप्पे पूर्ण झाले असून, तिसरा टप्पा उद्या (मंगळवार) आहे. जनतेचा मूड ध्यानात घेता भाजपाला देशात गेल्यावेळेपेक्षा जास्त, 300 पेक्षा अधिक जागा मिळतील. राज्यात भाजप महायुतीला 42 पेक्षा अधिक जागा मिळतील व त्यामध्ये बारामती व नांदेडचा समावेश असेल. राष्ट्रीय लोकशाही आघाडीला निवडणुकीत दोन तृतीयांशपेक्षा अधिक जागा मिळतील, असा दावाही जावडेकर यांनी केला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com