झोपड्यांवरील कारवाईत प्रकाश महेतांचा खोडा

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 16 एप्रिल 2017

मुंबई - विद्याविहार येथील मुख्य जलवाहिनीच्या परिसरातील झोपड्या हटवू नयेत, यासाठी गृहनिर्माणमंत्री प्रकाश महेताच झोपडीधारकांसह महापालिकेच्या पथकाला विरोध करण्यासाठी रस्त्यावर उतरल्याने पथकाला हात हलवत परतावे लागले. महेता यांच्या या कृतीमुळे उच्च न्यायालयाचा अवमान झाल्याने त्याबाबतचा अहवाल पालिका प्रशासन न्यायालयात सादर करणार आहे.

मुंबई उच्च न्यायालयाने मुख्य जलवाहिन्यांच्या परिसरातील झोपड्या हटविण्याचे आदेश महापालिकेला दिले होते. त्यानुसार आज विद्याविहार येथील 400 झोपड्या हटविण्यासाठी पालिकेच्या एन प्रभागाच्या सहायक आयुक्त भाग्यश्री कापसे यांच्यासह 200 कामगारांचे पथक गेले होते. मात्र त्याला झोपडीधारकांनी विरोध केला. झोपडीधारकांमध्ये गृहनिर्माणमंत्री महेताही सामील झाल्याने पालिकेचे पथक पेचात पडले. त्यात पोलिसांनीही अतिरिक्त बंदोबस्त पुरवण्यास नकार दिला. त्यामुळे या पथकाला आजची कारवाई रद्द करावी लागली, अशी माहिती सूत्रांनी दिली.

Web Title: prakash mehta disturb in slum crime