

Bhandup BEST Bus Accident
ESakal
मुंबई : बेस्ट बसचे अपघाताचे सत्र सुरु असताना नुकतेच भांडूप येथे बस अनियंत्रित झाल्यामुळे भीषण अपघात घडला. यामध्ये चौघांचा मृत्यू झाला असून ११ जण जखमी झाले आहेत. मात्र या दुर्घटनेत हक्काचा माणूस गमावलाच, सोबत संपूर्ण कुटुंबाचा आधार हरपला; अशा प्रतिक्रिया मृत्यू झालेल्या चौघांच्या कुटुंबीयांनी व्यक्त केल्या आहेत.