esakal | महाभारतातल्या संजयच्या दिव्यदृष्टीचा सेनेच्या आधुनिक संजयचा अविर्भाव; प्रसाद लाड यांचा टोला
sakal

बोलून बातमी शोधा

महाभारतातल्या संजयच्या दिव्यदृष्टीचा सेनेच्या आधुनिक संजयचा अविर्भाव; प्रसाद लाड यांचा टोला

बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या राज्यघटनेत न्यायालयांना अनन्यसाधारण महत्त्व आहे. त्या न्यायालयांवर पातळी सोडून टीका करणाऱ्या संजय राऊत यांनी खरेतर आणि डॉ. आंबेडकरांचा अपमान केला आहे.

महाभारतातल्या संजयच्या दिव्यदृष्टीचा सेनेच्या आधुनिक संजयचा अविर्भाव; प्रसाद लाड यांचा टोला

sakal_logo
By
कृष्ण जोशी

मुंबई ः बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या राज्यघटनेत न्यायालयांना अनन्यसाधारण महत्त्व आहे. त्या न्यायालयांवर पातळी सोडून टीका करणाऱ्या संजय राऊत यांनी खरेतर आणि डॉ. आंबेडकरांचा अपमान केला आहे. त्यामुळे शिवसेनेने त्यांची पक्षातून हकालपट्टी करावी अशी मागणी भारतीय जनता पक्षाचे नेते आमदार प्रसाद लाड यांनी केली आहे.

लाड यांनी आज एका ट्वीटद्वारे मुख्यमंत्र्यांकडे ही मागणी केली आहे. आपण सर्व व्यवस्थांच्यावर आहोत असे राऊत मानू लागले आहेत. त्यामुळे त्यांची खासदारकीदेखील काढून घ्यावी, असाही टोला लाड यांनी लगावला आहे. 

मुंबई परिसरातील बातम्यांचा आढावा घेण्यासाठी येथे क्लिक करा

कांजूरमार्ग कारशेड च्या कामाबाबत उच्च न्यायालयाने नुकताच जैसे थे आदेश दिला आहे. त्या आदेशावर राऊत यांनी टीका केली असल्याने तो न्यायालयाचा अवमान होतो असे मत भाजपच्या अनेक नेत्यांनी व्यक्त केली आहे त्यासंदर्भात लाड यांनी वरील प्रतिक्रिया दिली आहे

महाभारतातील संजय प्रमाणे आपल्याला दिव्यदृष्टी आहे असा अविर्भाव असणाऱ्या संजय राऊत यांची न्यायालयाबद्दलची वक्तव्य अत्यंत आक्षेपार्ह आणि निषेधार्ह आहेत. हा न्यायालयाला शहाणपणा शिकवण्याचा प्रकार असून यापूर्वीही राऊत यांनी अशीच विधाने केली असल्यामुळे न्यायालयाने त्याबद्दल त्यांच्यावर ताशेरेही ओढले होते. खासदाराने खासदारासारखे बोलावे असे खडे बोल उच्च न्यायालयाने त्यांना सुनावले होते. तरीही त्यातून त्यांनी कोणताही धडा घेतलेला नाही, असेही लाड यांनी दाखवून दिले आहे. 

यंदा आयटीआय प्रवेशाचा टक्का घसरला; तिसऱ्या फेरीनंतर 53 हजार 886 जागांवर प्रवेश

न्यायालयाला दुषणे देण्याआधी राऊत यांनी स्वतःच्या पक्षाला आणि पक्षातील आपल्या नेत्यांना चार शहाणपणाच्या गोष्टी सांगायला हव्या होत्या. पण कारशेड च्या बाबतीत आले राजाच्या आणि राजपुत्राच्या मना, तेथे कोणाचे चालेना अशी सध्याची परिस्थिती आहे. न्यायालयाच्या निर्णयावर टीका करणाऱ्या राऊत यांच्या विधानांची जबाबदारी सरकारला आणि तीनही पक्षांना घ्यावी लागणार आहे, असा इशाराही लाड यांनी दिला.

Prasad Lad criticizes Shiv Sena

-------------------------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )

loading image