कर्नल प्रसाद पुरोहित यांच्या अडचणीत वाढ 

कर्नल प्रसाद पुरोहित यांच्या अडचणीत वाढ 

मुंबई - 2008 मालेगाव बॉम्बस्फोटातील प्रमुख आरोपी लेफ्टनंट कर्नल प्रसाद पुरोहितांच्या अडचणी वाढल्या आहेत. उच्च न्यायालयाचे न्या. एस. एस. शिंदे गुरुवारी गैरहजर असल्याने पुरोहित यांनी दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी होऊ शकली नाही. राष्ट्रीय तपास संस्थेच्या (एनआयए) विशेष न्यायालयाने पुरोहित यांच्या विरोधात बेकायदेशीर कृत्याविरोधी (अनलॉफुल ऍक्‍टिव्हिटीज प्रिव्हेन्शन ऍक्‍ट अर्थात युएपीए) कायद्यांतर्गत खटला चालवण्यास परवानगी दिली होती. पुरोहित यांनी या निर्णयाविरोधात उच्च न्यायालयात आव्हान देणारी याचिका आज दाखल केली होती. 

मालेगाव बॉम्बस्फोटप्रकरणी शुक्रवारी एनआयए उच्च न्यायालयात युएपीए कायद्यांतर्गत खटला चालणार असून सर्व आरोपींवर आरोपनिश्‍चिती होणार आहे. दरम्यान, यूएपीए कायद्यांतर्गत हा खटला चालवू नये, अशी याचिका आरोपी कर्नल पुरोहित यांनी दाखल केली होती. ही याचिका विशेष एनआयए न्यायालयाने फेटाळून लावली आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com