

Pratap Sarnaik
Esakal
भाईंदर : मिरा-भाईंदर महापालिकेच्या निवडणुकीनिमित्त परिवहनमंत्री प्रताप सरनाईक आणि भाजपचे आमदार नरेंद्र मेहता यांच्यात सुरू असलेल्या वादात सरनाईक यांनी पुन्हा एकदा मेहता यांच्यावर टीकेची झोड उठवली आहे. मिरा भाईंदरची सूर्या धरण पाणी योजना आणि मेट्रो नरेंद्र मेहता यांच्या कंपनीमुळेच दोन वर्षे रखडल्याचा आरोप सरनाईक यांनी केला आहे.