

ST Bus scheme
ESakal
मुंबई : हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त शिवसेना पक्ष कार्यालय येथे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बाळासाहेब भवन येथील त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. या वेळी विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, परिवहनमंत्री प्रताप सरनाईक, उद्योगमंत्री उदय सामंत आदी उपस्थित होते. दुसरीकडे बाळासाहेबांच्या दादर येथील स्मृतिस्थळाला दिवसभर नेते आणि कार्यकर्त्यांनी अभिवादन केले.